Join us

तोंडाला घाण वास येतो? ५ उपाय - रोजची दुर्गंधी होईल कमी-दात चमकतील मोत्यासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2025 17:03 IST

1 / 8
तोंडाच्या दुर्गंधीमुळे आपल्याला अनेकदा लाज वाटू लागते. दिवसातून दोन वेळा ब्रश करुनही अनेकदा तोंडाचा वास येतो. यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो, बोलताना भीती वाटू लागते. एकमेकांच्या जवळ असलो तर हा वास काही केल्या लपत नाही. यामुळे लोक देखील आपल्यापासून लांब राहतात. (bad breath remedies)
2 / 8
आपल्याही तोंडाची दुर्गंधी येत असेल तर योगा वेलनेस तज्ज्ञ हंसा योगेंद्र यांनी सोपे ५ उपाय सांगितले आहे. ज्यामुळे दुर्गंधी तर कमी होईलच पण दात सुद्धा मोत्यासारखे चमकतील. (how to cure mouth odor)
3 / 8
तोंडाच्या दुर्गंधीचा वास येत असेल तर पचनसंस्थेशी काही दैनंदिन सवयींशी आणि जीवनशैलीशी संबंधित आहे. यासाठी आपण त्रिफळाने चूळ भरायला हवी. आवळा, हरडा आणि बेहडा याचे मिश्रण असलेले त्रिफळा हिरड्यांची जळजळ कमी करते. हे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी गाळून घ्या आणि माउथवॉश करा.
4 / 8
बडीशेप आणि भाजलेले जिरे चावून खा. यामुळे पचन होण्यास मदत होते. गॅस आणि अपचन कमी होते. याचा हर्बल चहा देखील पिऊ शकतो.
5 / 8
अनेकदा दात घासताना जिभेवरील घाण आणि बॅक्टेरियांकडे दुर्लक्ष केले जाते. ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी येते. यासाठी तांबे किंवा स्टीलच्या टंगने जीभ स्वच्छ करत राहा.
6 / 8
तोंड कोरडे पडल्याने देखील तोंडाची दुर्गंधी वाढू शकते. यासाठी भरपूर पाणी प्यायला हवं. लिंबू पाणी किंवा तुळस घातलेले कोमट पाणी प्या. जास्त चहा आणि कॉफी पिणे टाळा.
7 / 8
घशातील किंवा सायनसमुळे वास येत असेल तर कापूर आणि लवंगाची वाफ घ्या. ज्यामुळे नाक आणि घसा साफ होईल आणि दुर्गंधी कमी होईलय
8 / 8
नारळाचे तेल किंवा गायीचे तूप हलके गरम करुन नाकात लावा आणि श्वास घ्या. नाक ओलसर राहिल आणि तोंडाचा वास येणार नाही.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स