Join us
Daily Top 2 Weekly Top 5

अंगाला येणारा घाम आणि घामाचा वास सांगतो शरीरात काय बिघडतंय, दिसायला फिट पण तुम्ही आजारीच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2026 09:40 IST

1 / 6
घाम येणं ही खूप साधारण बाब. पण तरीही त्याचं स्वरुप कसं आहे, तुम्हाला घाम कधी येतो यावरून तुमच्या तब्येतीच्या बाबतीत कितीतरी गोष्टी स्पष्ट होतात...
2 / 6
उदाहरणार्थ दोन व्यक्ती जर एका खोलीत अगदी शेजारी शेजारी बसलेल्या असतील तरीही त्यांना येणाऱ्या घामाचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. यावरूनच त्या दोघांची प्रकृती एकसारखी नाही हे लक्षात येतं. घाम येण्याचं कंट्रोलिंग आपल्या मज्जा संस्थेवर अवलंबून असतं तर त्याच्यावर तापमान, आपल्या इमोशन्स आणि हार्मोन्स यांचा परिणाम होत असतो.
3 / 6
जर आजुबाजुचे वातावरण उष्ण नसताना किंवा तुम्ही कोणताही शारिरीक व्यायाम केलेला नसतानाही तुम्हाला खूप घाम येत असेल तर तो नक्कीच हार्मोन्स, स्ट्रेस यांचा परिणाम असू शकतो. अशावेळी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे.
4 / 6
डॉ. सप्तर्षी भट्टाचार्य यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला रात्रीच्या वेळी दरदरून घाम येत असेल किंवा सकाळी उठताच तुम्हाला खूप घाम आलेला असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
5 / 6
जर घाम येऊन तुमचं शरीर थंड पडत असेल तर ते हृदयाच्या बाबतीतलं एक अतिशय धोक्याचं लक्षण असू शकतं. त्यामुळे अशा लोकांनी त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
6 / 6
शारिरीक श्रम न करताही खूप घाम येत असेल तर तो थायरॉईड, मधुमेह यांचंही लक्षण असू शकतो. किंवा महिलांमध्ये ते मेनोपॉजचंही एक लक्षण आहे.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोगमधुमेह