Join us

हिल्स घातल्यामुळे पायांना जखम झाली- रक्त निघतं? ४ उपाय - मलम न लावता पाय होतील सॉफ्ट- जखमही भरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2025 17:00 IST

1 / 7
सणसमारंभात किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये आपल्याला सुंदर दिसायचे असते. यासाठी आपण कपडे, दागिने आणि फुटवेअरकडे अधिक लक्ष देतो. साडी किंवा ड्रेसवर मॅचिंग होणारी ज्वेलरी आणि फुटवेअर घालतो. अनेक महिलांना हिल्स घालण्यासाठी खूप आवडते. यामुळे पाय सुंदर दिसतात. (Heels foot injury remedy)
2 / 7
हिल्स घातल्यामुळे अनेकदा टाचा दुखतात, जखम होते ज्यामुळे पायातून रक्त देखील निघू लागत. अशावेळी चालताना देखील त्रास होतो. आपण योग्य तो औषधोपचार करतो पण जखम काही लवकर बरी होत नाही. जर आपल्याला देखील अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर काही सोपे उपाय करुन पाहा. (Bleeding feet after heels)
3 / 7
हिल्समुळे टाचांना त्रास होतो. ज्यामुळे पायांना जखम होते किंवा फोड येतात. यावेळी जखमेवर ताजे कोरफड लावा. ज्यामुळे जखम लवकर भरुन निघेल. आग-जळजळ कमी होईल.
4 / 7
पायांना हिल्समुळे जखम झाली असेल तर नारळाचे तेल लावा. यामुळे टाचांना मॉइश्चरायझर मिळते आणि बरे होण्यास मदत होतो. नारळाच्या तेलात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे संसर्ग रोखण्यास मदत करतात.
5 / 7
हळद आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट जखमेवर हलक्या हाताने लावा. हे नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणून काम करते आणि वेदना कमी करते.
6 / 7
पायांच्या नसा दुखत असतील तर मिठाच्या कोमट पाण्यात १० मिनिटे पाय बुडवा. यामुळे सूज आणि थकवा कमी होईल.
7 / 7
हिल्समुळे पाय दुखत असतील तर त्या भागावर १५ मिनिटांपर्यंत बर्फ चोळा. यामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स