1 / 7बहुतांश जणांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि डी ३ यांची कमतरता असते. शाकाहारी लोकांच्या शरीरात तर व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता प्रामुख्याने दिसून येते.2 / 7शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी असेल तर डिप्रेशन येणं, निर्णयक्षमता कमी होणं, हातापायांना सतत मुंग्या येणं, आळस येणं असे त्रास होतात. 3 / 7 तसेच जर शरीरात व्हिटॅमिन डी ३ कमी असेल तर त्यामुळेही हाडं ठिसूळ होणं, स्नायूंमध्ये नेहमीच वेदना असणे असे वेगवेगळे त्रास होतात. हे त्रास कमी करण्यासाठी बी १२ आणि डी ३ दाेन्ही वाढणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय उपाय करायला पाहिजे, याची माहिती तज्ज्ञांनी thinkbank.official या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.4 / 7B12 वाढावं यासाठी तज्ज्ञ सांगतात की सगळ्यात आधी तुमच्या पचनक्रियेवर काम करा. घरचं सकस अन्न घ्या. बाहेरचं खाणं टाळा. जर तुमची पचनक्रिया चांगली राहिली तर आपोआप शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ चं प्रमाण चांगलं होण्यास मदत होईल.5 / 7व्हिटॅमिन डी ३ वाढविण्यासाठीचा एक उपाय म्हणजे सकाळच्या कोवळ्या सुर्यप्रकाशात घराच्या बाहेर पडा आणि व्यायाम करा. किंवा कोवळ्या उन्हात नुसताच फेरफटका मारून या. यामुळे शरीरातलं व्हिटॅमिन डी ३ वाढण्यास मदत होईल.6 / 7दही, पनीर, चीज, फोर्टीफाईड फूड खाऊन तुम्ही शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ वाढवू शकता.7 / 7तर व्हिटॅमिन डी ३ वाढविण्यासाठी दूध आणि दूग्धजन्य पदार्थ खाणं उपयुक्त ठरतं.