B12 Deficiency: नेहमीच्याच पोळ्यांमधून मिळेल भरपूर व्हिटॅमिन B12! कणिक मळताना 'हा' पांढरा पदार्थ घाला
Updated:September 15, 2025 13:17 IST2025-09-15T13:06:31+5:302025-09-15T13:17:43+5:30

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता अनेक लाेकांच्या शरीरात दिसून येते. शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ कमी असल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात.(how to get rid of vitamin b 12 deficiency?)
कायम थकवा येणे, नैराश्य येणे, उदास वाटणे, कोणत्याही कामात लक्ष न लागणे असे कित्येक त्रास व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे होतात.(how to make roti with vitamin b12?)
याशिवाय हातापायांना मुंग्या येणे, निर्णयक्षमता कमी होणे, असा त्रासही व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे होतात.(superfood for vitamin B12)
हे त्रास कमी करायचे असतील तर तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घेऊन आहारात बदल करायला हवेत. त्यासोबतच अगदी रोजच्या रोज कणिक भिजवतानाही तुम्ही एक साधी सोपी गोष्ट करू शकता.
हा उपाय करण्यासाठी आपण जेव्हा पोळ्या किंवा चपात्या करण्यासाठी गव्हाचे पीठ घेतो, तेव्हा त्यामध्ये थोडे दही घाला आणि गरम पाणी घालून ती कणिक भिजवा.
यात तुम्ही थोडंसं मीठ किंवा थोडीशी साखरही घालू शकता.
यानंतर हे पीठ काही मिनिटांसाठी झाकून ठेवा आणि त्यानंतर त्याच्या पोळ्या, फुलके करून खा.
दह्यामुळे तसेच गरम पाण्यात कणिक भिजवल्यामुळे तिच्यामधले काही घटक ॲक्टीव्ह होतात आणि त्यातून व्हिटॅमिन बी १२ मिळते, अशी तज्ज्ञांनी दिलेली माहिती webchatorey या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.