1 / 6बैठ्या जीवनशैलीमुळे आणि आहारात झालेल्या बदलामुळे अनेकांना मुळव्याधीचा त्रास होत आहे. कमी वयात हा त्रास सुरू झालेले अनेक जण आपण आजुबाजुला पाहातो.2 / 6हा त्रास कमी करण्यासाठी काय उपाय करता येईल याविषयीचे काही उपाय रामदेव बाबा यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.3 / 6यामध्ये ते सांगतात की नागदोन या वनस्पतीची काही पानं रोज सकाळी उपाशीपोटी चावून खा. सलग काही दिवस हा उपाय केल्यास अवघ्या ८ दिवसांत बराच आराम मिळेल.4 / 6रामदेव बाबा यांनी सांगितलेला दुसरा उपाय म्हणजे आहारात दुधी भोपळ्याचा वापर वाढवा. दुधी भोपळ्याचे सूप, भाजी, रस असे पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे घ्या. मुळव्याधीचा त्रास बराच कमी होईल.5 / 6फायबरयुक्त भाज्या आहारात जास्त प्रमाणात घेतल्यानेही मुळव्याधीचा त्रास कमी होतो.6 / 6याशिवाय ज्या लोकांना मुळव्याधीचा त्रास असेल त्यांनी मसालेदार, तिखट पदार्थ कमीतकमी प्रमाणात खावे.