आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ होते? अ‍ॅसिडिटी कमी करणारे ७ उपाय

Published:March 30, 2023 03:29 PM2023-03-30T15:29:42+5:302023-03-30T15:37:09+5:30

How to Get Rid of Acidity: 7 Ways अ‍ॅसिडिटी छळते? यासाठी ७ घरगुती सोपे उपाय करून पाहा..

आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ होते? अ‍ॅसिडिटी कमी करणारे ७ उपाय

छातीत जळजळ ही अशी स्थिती आहे, जी दरवर्षी लाखो लोकांना छळते. आपल्या भारतीय जेवणात मसाल्यांचा वापर अधिक केला जातो. ज्यामुळे साहजिक अ‍ॅसिडिटीचा त्रास हा होणार. ज्यात छातीत जळजळ, पोटात आग होणे, आंबट ढेकरमुळे लोकं हैराण होतात. छातीत जळजळ अनेकदा ऍसिड रिफ्लक्समुळे होते, अन्न पचवण्यासाठी अ‍ॅसिडची गरज असते. पण जेव्हा त्याचे प्रमाण वाढते, तेव्हा ती अन्नासोबत आतड्यात जाण्याऐवजी तोंडाच्या दिशेने येऊ लागते. यावर उपचार न केल्यास, आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जर आपल्याला अ‍ॅसिडिटीचा त्रास जास्त जाणवत असेल, तर या काही उपाय करून पाहा(How to Get Rid of Acidity: 7 Ways).

आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ होते? अ‍ॅसिडिटी कमी करणारे ७ उपाय

काही पदार्थांमुळे छातीत जळजळ निर्माण होते. ज्यात मसालेदार पदार्थ, आम्लयुक्त पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ आणि कॅफीन यांचा समावेश आहे. काही खाद्यपदार्थांमुळे जर छातीत जळजळ होत असेल तर, ते पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा.

आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ होते? अ‍ॅसिडिटी कमी करणारे ७ उपाय

अतिप्रमाणावर अन्न खाल्ल्याने खालच्या एसोफेजियल स्फिंक्टरवर दबाव वाढू शकतो, जो पोटातील आम्ल अन्ननलिकेमध्ये परत येण्यापासून रोखते. यामुळे छातीत जळजळ होते. दिवसभरात कमी किंवा, गॅप घेऊन अन्न खा.

आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ होते? अ‍ॅसिडिटी कमी करणारे ७ उपाय

जेवल्यानंतर लगेच झोपल्याने छातीत जळजळ होते. जेवल्यानंतर किमान अर्धां तास शतपावली करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जर लवकरच झोपायचे असेल, तर तुमचे डोके उशीने टेकवून शरीराचा वरचा भाग उंच ठेवण्याचा प्रयत्न करा.

आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ होते? अ‍ॅसिडिटी कमी करणारे ७ उपाय

घट्ट कपडे, विशेषत: कमरेभोवती, पोटावर दबाव आणू शकतात. ज्यामुळे छातीत जळजळ होण्याचा धोका वाढू शकतो. विशेषतः जेवणानंतर, सैल-फिटिंग कपडे घालण्याचा प्रयत्न करा.

आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ होते? अ‍ॅसिडिटी कमी करणारे ७ उपाय

नियमित व्यायाम केल्याने अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे अन्न लवकर पचते. योग्य आहार आणि व्यायामाद्वारे छातीत जळजळ ही समस्या उद्भवत नाही.

आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ होते? अ‍ॅसिडिटी कमी करणारे ७ उपाय

तणावामुळे छातीत जळजळ होण्याचा धोका वाढू शकतो. ध्यान, योग किंवा व्यायाम केल्याने तणाव कमी होते.

आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ होते? अ‍ॅसिडिटी कमी करणारे ७ उपाय

धूम्रपानामुळे LES कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे छातीत जळजळ होण्याचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही धूम्रपान करत असाल, तर वेळीच सोडा, असे केल्याने छातीत जळजळ होण्याचा धोका.