1 / 6हिवाळ्याच्या दिवसांत हाडांचं दुखणं जरा जास्तच वाढतं. अंग आखडून जातं. स्नायूंमध्येही वेदना होतात.2 / 6याशिवाय या दिवसांत सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रासही खूप वाढलेला दिसताे. गुडघे अगदी बसता- उठता ठणकतात. चालताना टाच, घोटेही दुखतात.3 / 6हा सगळा त्रास कमी करायचा असेल तर पुढे सांगितलेला एक खास उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी स्टीलच्या पातेल्यामध्ये १ ग्लास पाणी गरम करायला ठेवा. त्या पाण्यामध्ये २ ते ३ लवंगा बारीक ठेचून टाका.4 / 6त्यानंतर त्यामध्ये १ मोठी वेलची आणि दालचिनीचा एक तुकडाही थोडासा ठेचून टाका. पाणी ४ ते ५ मिनिटे उकळू द्या आणि नंतर गॅस बंद करा.5 / 6यानंतर पाणी गाळून घ्या आणि कोमट झाल्यानंतर रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने प्या. यानंतर १५ मिनिटांनी बडिशेप बारीक चावून खा.6 / 6हा उपाय केल्याने सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो. शरीरातील रक्ताभिसरण सुधारून नसांना बळ मिळतं. शिवाय स्नायूंचं दुखणंही कमी होतं, असं डॉक्टरांनी dr_yogesh_ghongde या इंस्टाग्राम पेजवर सुचवलं आहे.