Join us

दाढ प्रचंड ठणकतेय? 'हा' उपाय करा- १५ मिनिटांत दुखणं थांबेल! डॉक्टरकडे जाण्यापूर्वीचा प्रथमोपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2025 16:08 IST

1 / 7
दात दुखीचा त्रास अनेकजणांना होतो. थंड- गरम पदार्थ खाण्यात आले तर दात ठणकू लागतात.
2 / 7
दाढा ठणकायला लागल्या किंवा हिरड्या दुखायला लागल्या तर लगेच काही जण औषधं- गोळ्या घेऊन मोकळे होतात.
3 / 7
पण त्यापेक्षा हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहिला तर काही मिनिटांतच दातदुखी कमी होऊ शकते. तो उपाय नेमका कोणता याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी nutritionistdeepaa या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
4 / 7
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडी मिरेपूड घ्या.
5 / 7
२ ते ३ लवंग थोड्या भाजून घ्या आणि नंतर त्या थोड्या कुटून घ्या. मिरेपूड आणि लवंग एकत्र करा. त्यांच्यामध्ये असणारे ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टी फंगल गुणधर्म दाढेचं दुखणं कमी करण्यासाठी मदत करतात.
6 / 7
आता लवंग आणि मिरेपूड यांच्यात थोडं मोहरीचं तेल घाला आणि त्यांची पेस्ट करा. ही पेस्ट दुखऱ्या दाढेवर, हिरड्यांवर लावा.
7 / 7
१० ते १५ मिनीटांसाठी ती तशीच ठेवा. तोपर्यंत काहीही खाऊ नका. २० मिनिटांनी तोंडातलं पाणी थुंकून टाका. हिरड्या, दाढांना लगेच आराम मिळेल.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी