शरीरातलं घातक युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्याचे ७ उपाय; हाडं-मसल्स राहतील मजबूत
Updated:April 6, 2026 21:30 IST2026-04-06T21:21:43+5:302026-04-06T21:30:53+5:30
How To Control Uric Acid : जास्त वजनामुळे युरिक अॅसिड वाढण्याची शक्यता जास्त असते म्हणून वजन नियंत्रणात ठेवा.

शरीरात वाढलेलं युरिक अॅसिड कमी करण्यासाठी दिवसाला कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या. युरिक अॅसिड शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. (How To Control Uric Acid)
साखर आणि फ्रुक्टोज कमी करा जसं की सॉफ्ट ड्रिंक्स, ज्यूस यांसारख्या पदार्थांमुळे शरीरातील युरिक अॅसिड वाढतं. (7 Easy Ways To Control Uric Acid)
जास्त वजनामुळे युरिक अॅसिड वाढण्याची शक्यता जास्त असते म्हणून वजन नियंत्रणात ठेवा.
रोज चालणं,योगा किंवा हलका व्यायाम केल्यानं पातळी नियंत्रणात राहते. म्हणून शारिरिक हालचाल जास्तीत जास्त ठेवा.
दूध, दही यांसारखे पदार्थ युरिक अॅसिड वाढवतात म्हणून आहारात लो फॅट डेअरी पदार्थांचा समावेश करा.
खूप वेळ न खाल्ल्यामुळे शरीरातील युरिक एसिड वाढतं. म्हणून जास्तवेळ उपाशी राहणं टाळा. उपवास करत असाल तर शरीर हायड्रेट ठेवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
पॅकेज्ड आणि जंक फूड युरिक अॅसिड वाढवते, म्हणून प्रोसेस्ड फूड खाणं टाळा. पॅकेज्ड आणि जंक फूड खाल्ल्यानं तब्येतीच्या इतर समस्या उद्भवू शकतात.