Join us

किडनीचे आजार नको असतील तर आहारात हवेतच ८ पदार्थ, किडनी स्टोनसह बॅक्टेरियल इन्फेक्शन राहते दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2025 14:23 IST

1 / 9
किडनी अत्यंत महत्वाचा अवयव. किडनीचे काम बिघडले तर मात्र रक्त शुद्ध होत नाही, युरिक ॲसिडचा त्रास वाढतो आणि किडनी स्टोनच्या वेदनाही छळतात.(how to prevent kidney stones naturally)
2 / 9
किडनीने आपले काम चांगले करावे आणि स्टोन होऊ नये असं वाटतं असेल तर हे ८ पदार्थ आपल्या आहारात हवेतच. पिंपल्स, एक्झिमा, रॅशेस सारख्या समस्याही कमी होतील. (best foods to avoid kidney infections)
3 / 9
आपण रोज ७ ते ८ ग्लास पाणी प्यायलाच हवे. ज्यामुळे किडनीत साठलेले विषारी पदार्थ सहज काढून टाकण्यास मदत होते. शरीराला पुरेसे पाणी मिळाले नाही तर डिहायड्रेशनची समस्या तर होतेच पण किडनी स्टोनचा धोका देखील वाढतो.
4 / 9
लिंबू हे किडनीसाठी डिटॉक्स ड्रिंक आहे. यात असणारे सायट्रिक ॲसिड शरीरासाठी अत्यंत आवश्यक.
5 / 9
क्रॅनबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे किडनीला होणाऱ्या अनेक संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होतं. सिस्टॅटिन सी ची पातळी कमी करते.
6 / 9
पालक आणि इतर हिरव्या भाज्या किडनीसाठी फायदेशीर आहेत. यामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.
7 / 9
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर हे किडनीसाठी डिटॉक्स ड्रिंक आहे.
8 / 9
कलिंगड खाणंही उत्तम. लाइकोपीन आणि पोटॅशियम हे लघवीतील आम्लता नियंत्रित करते.
9 / 9
जास्त प्रमाणात मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ किडनीवर परिणाम करतात. यामुळे रक्तदाब वाढतो, पाण्याचे संतुलन बिघडते. त्यासाठी शक्य तितके कमी मीठ, आणि सॉल्टेड पदार्थ कमी करणं हिताचं.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स