1 / 7कधी कधी हिरड्या खूप ठणकतात, लालसर होऊन त्यांच्यावर सूज येते. एवढंच नाही तर त्यांना खूप खाजही येते. या दुखण्याला Gingivitis असं म्हणतात. 2 / 7असा त्रास तुम्हाला होत असेल तर त्यावर कोणते घरगुती उपाय करता येतील, ते आता पाहूया... 3 / 7सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे. यासाठी आधी पाणी थोडं गरम करून घ्या. त्यात मीठ टाकून पाणी हलवून घ्या आणि या पाण्याने दिवसातून ४ ते ५ वेळा गुळण्या करा. त्या जागेवरचं बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.4 / 7आयुर्वेदानुसार oil pulling हा देखील यावरचा एक उत्तम उपाय मानला जातो. यासाठी सगळ्यात उत्तम तेल म्हणजेच खोबरेल तेल. खोबरेल तेलामध्ये असणारे ॲण्टीमायक्रोबियल गुणधर्म हिरड्यांचं दुखणं कमी करण्यासाठी मदत करतात. 5 / 7कोरफडीचा गर गरम पाण्यात टाकून त्या पाण्याने गुळण्या केल्यास दुखऱ्या हिरड्यांना आराम मिळतो. 6 / 7हळदीमध्ये थोडं साजूक तूप गरम करून टाका आणि दुखऱ्या हिरडीवर त्या हळदीने हळूवार चोळा. दुखणं बरं होईल. 7 / 7बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट हिरड्यांवर लावून ठेवा. दुखणं कमी होण्यास आराम मिळेल. या पेस्टमध्ये लवंग पावडर टाकल्यास ते अधिक परिणामकारक ठरेल.