'या' छोट्याशा बियांचं दूध म्हणजे हाडांसाठी पॉवरफूल टॉनिक! ताकद येऊन हाडं होतील मजबूत

Updated:January 15, 2026 14:36 IST2026-01-15T14:30:17+5:302026-01-15T14:36:47+5:30

'या' छोट्याशा बियांचं दूध म्हणजे हाडांसाठी पॉवरफूल टॉनिक! ताकद येऊन हाडं होतील मजबूत

बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की थोडं काम जास्त झालं की लगेच पाठ, कंबर गळून जातं. महिलांना तर असा अनुभव नेहमीच येत असतो. सणवाराच्या निमित्ताने नेहमीपेक्षा थोडं जास्त काम झालं की लगेच अंगदुखी सुरू होते. गुडघे दुखतात.(home made super tonic for strong bones)

'या' छोट्याशा बियांचं दूध म्हणजे हाडांसाठी पॉवरफूल टॉनिक! ताकद येऊन हाडं होतील मजबूत

हे त्रास होण्यामागचं कारण म्हणजे तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे (sesame milk for strong bones). ही कमतरता भरून काढण्यासाठी एक अतिशय सोपा उपाय तज्ज्ञांनी shweta_food_club या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.(how to keep bones healthy and strong?)

'या' छोट्याशा बियांचं दूध म्हणजे हाडांसाठी पॉवरफूल टॉनिक! ताकद येऊन हाडं होतील मजबूत

यामध्ये त्यांनी एक खास प्रकारचं दूध प्यायला सांगितलं आहे. हे आपलं नेहमीचं दूध नाही. या दुधातून तुम्हाला खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम मिळतं. ते दूध कोणतं आणि ते कसं करायचं पाहा..

'या' छोट्याशा बियांचं दूध म्हणजे हाडांसाठी पॉवरफूल टॉनिक! ताकद येऊन हाडं होतील मजबूत

हे दूध तयार करण्यासाठी आपल्याला तीळ वापरायचे आहेत. २ चमचे तीळ घ्या आणि ते अर्धा ग्लास पाण्यामध्ये ५ ते ६ तास भिजत घाला.

'या' छोट्याशा बियांचं दूध म्हणजे हाडांसाठी पॉवरफूल टॉनिक! ताकद येऊन हाडं होतील मजबूत

यानंतर हे पाणी मिक्सरमधून फिरवून घ्या. छान पातळ दूध तयार होईल. हे दूध दिवसातून एकदा प्या.

'या' छोट्याशा बियांचं दूध म्हणजे हाडांसाठी पॉवरफूल टॉनिक! ताकद येऊन हाडं होतील मजबूत

काही दिवस नियमितपणे प्यायल्यास हाडांना भरपूर कॅल्शियम मिळेल आणि हाडं ठणठणीत होऊन त्यांचं दुखणं कमी होईल.