Join us

छातीत सारखी जळजळ, पोटात आग पडते- झोप येत नाही? ५ पदार्थ, ॲसिडिटीवर कायमचा इलाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2025 17:27 IST

1 / 7
रात्री उशिरा जेवल्यानंतर अनेकदा आपल्याला ॲसिडीटीचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे आपल्याला सतत छातीत जळजळ किंवा पोटात आग पडू लागते. तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्याने ॲसिडी रिफ्लक्स होते. (Nighttime indigestion)
2 / 7
झोपताना आपल्याला छातीत जळजळ किंवा वेदना सहन कराव्या लागतात. ज्यामुळे आपल्याला अस्वस्थता जाणवते. जर आपल्यालाही उशिरा जेवण्याची सवय असेल किंवा सतत छातीत जळजळ होत असेल तर ५ पदार्थ खायला हवे.(Best foods for acid reflux and bloating relief)
3 / 7
रात्रीच्या वेळी अधिक तेलकट, मसालेदार पदार्थ खाऊ नका. या पदार्थांमुळे पोटात आम्लता वाढते, ज्यामुळे अॅसिड रिफ्लेक्सची लक्षणे वाढतात. (Home remedies for heartburn)
4 / 7
आपण आहारात प्रोबायोटिक्स असलेले पदार्थ खा. यामुळे पोटात चांगले बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारुन छातीत जळजळ कमी होते. यासाठी दही खायला हवे.
5 / 7
आल्यामध्ये जिंजरॉल कंपाऊंड आढळते. यामुळे शरीराला दाहक-विरोधी गुणधर्म मिळतात. जे पचनसंस्थेला शांत करण्यास मदत करतात.
6 / 7
ग्रीन टी ही अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यात असणारे घटक अॅसिड रिफ्लेक्सची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. हे कॅफिनमुक्त आहे. ज्यामुळे आपल्या पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
7 / 7
हायड्रेटिंग गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखले जाते. यामुळे छातीत जळजळ कमी होण्यास मदत होते.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स