1 / 7कोरोना व्हायरसचा धोका पुन्हा वाढतो आहे. सध्या ॲक्टीव्ह असलेला व्हेरिएंट फारसा चिंताजनक नसला तरी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.2 / 7कोरोनापासून स्वत:चा आणि आपल्या कुटुंबियांचा बचाव कसा करायचा, हे आपल्याला माहितीच आहे. पण तरीही काही गोष्टींचा विसर पडला असेल तर FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी इंडिया यांनी सांगितलेले हे काही नियम पाहून घ्या. मागच्यावेळी कोरोनाचा संसर्ग वाढला असताना FSSAI ने या गाईडलाईन्स दिल्या आहेत. 3 / 7प्रत्येकवेळी स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा, गॅस शेगडी अगदी स्वच्छ पुसून घ्या.4 / 7याशिवाय दररोज सकाळ- संध्याकाळ स्वयंपाक झाल्यानंतर ओटा आणि शेगडीची स्वच्छता करा.5 / 7स्वयंपाक घरातल्या भांड्यांच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष द्या. प्रत्येकवेळी वापरानंतर भांडे धुवून घ्या तसेच वापरण्यापुर्वीही भांडे स्वच्छ पुसून घ्या.6 / 7FSSAI च्या या गाईडलाईन्स शिवाय इतर गोष्टींची काळजीही घेतली पाहिजे. जसे की स्वयंपाक घरात येणाऱ्या भाज्या नेहमी स्वच्छ धुवून कोरड्या करून मगच फ्रिजमध्ये ठेवाव्या.7 / 7बाजारातून आणलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची पाकिटे आपल्या घरात आणल्यावर आधी पुसून घ्यावीत. जी शक्य आहेत ती धुवून घ्यावीत. तेच त्यांना हात लावल्यानंतर आपले हातही स्वच्छ धुवून घ्यावेत.