By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 08:40 IST
1 / 8पोट साफ होण्यासाठी आणि बद्धकोष्टतेचा त्रास कमी करण्यासाठी फायबर्सयुक्त फळं अत्यंत फायदेशीर ठरतात. काही फळांचा आहारात समावेश केल्यास पचनसंस्था सुधारते. (Fruits That Helps For Constipation)2 / 8पिकलेल्या केळ्यामध्ये सोल्यूबल फायबर्स असतात. जे शौचाला मऊ करतात. मलविसर्जन सुलभ करतात.3 / 8पेरूमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. पेरूच्या बियांसह ते खाल्ल्यानं आतड्यांची सफाई नीट होत नाही.4 / 8 सफरचंदात पेक्टिन नावाचे फायबर असते.सालीसकट सफरचंद खाल्ल्यानं बद्धकोष्टतेचा त्रास दूर होतो.5 / 8ताजी किंवा वाळलेली अंजीर नैसर्गीक रेचक म्हणून काम करतात. रात्री अंजीर भिजवून सकाळी खाल्ल्यानं पोट साफ होण्यास मदत होते.6 / 8 या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटामीन सी आणि फायबर असते. जे पचनशक्ती वाढते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.7 / 8 पपईमध्ये पपेन नावाचे पाचक एन्जाईम्सस असतात जे प्रथिनं पचवण्यास आणि आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणं उत्तम ठरतं.8 / 8ही फळं खाण्यासोबतच दिवसभरात पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. कारण फायबर्स कार्य करण्यासाठी पाण्याची गरज असते.