वारंवार लघवी लागते, जळजळ- वेदनाही होतात? ५ पदार्थ नियमित खा, युरिन इन्फेक्शन त्रास होतो कमी
Updated:July 9, 2025 12:46 IST2025-07-09T12:19:24+5:302025-07-09T12:46:09+5:30
UTI home remedies: urinary infection treatment food: burning urination relief: युरिन इन्फेक्शन झाल्यानंतर आपण अनेक औषधे खातो परंतु, अशावेळी आहारात बदल केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो.

युरिन इन्फेक्शन झाल्यास आपल्याला लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे, वारंवार लघवीला येणे किंवा ओटीपोटीत दुखण्याची समस्या वाढू शकते. यावेळी अचानक ताप येणे, थंडी वाजणे किंवा मळमळ देखील होऊ शकते.
युरिन इन्फेक्शन झाल्यानंतर आपण अनेक औषधे खातो परंतु, अशावेळी आहारात बदल केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो.
वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे, कमी लघवी होणे, फेसयुक्त लघवी, लघवीचा रंग लाल, चमकदार गुलाबी किंवा काळा रंग, लघवीमध्ये थोडे रक्त, लघवीमध्ये दुर्गंधी येणे, खालच्या ओटीपोटात वेदना होणे इत्यादी लक्षणे हा युरिन इन्फेक्शनची असतात. अशावेळी कसा आहार घ्यावा जाणून घेऊया.
व्हिटॅमिन सी असणारे पदार्थ आपण खायला हवे. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. यासाठी आहारात लिंबू, टोमॅटो आणि संत्री खा.
भरपूर पाणी प्या. यामुळे लघवी पातळ होण्यास मदत होईल. तसेच अधिक वेळा लघवीला आल्याने बॅक्टेरिया बाहेर पडतात.
क्रॅनबेरी ज्यूस युरिन इन्फेक्शन रोखण्यास फायदेशीर आहे. यात अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यासाठी हा ज्यूस नेहमी प्या.
दररोज रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्या. ४ ते ५ मनुके रात्रभर पाण्यात भिजवा, सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. यामुळे शरीराला थंडावा मिळतो, अशक्तपणा दूर होतो.
ग्लासभर पाण्यात १ चमचा अॅपल सायडर व्हिनेगर, अर्धा चमचा लिंबाचा रस, मध मिसळा. यामुळे युरिन इन्फेक्शन लवकर बरे होण्यास मदत होते.