चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण

Updated:July 2, 2025 14:42 IST2025-07-02T14:29:19+5:302025-07-02T14:42:11+5:30

पावसाळ्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आरोग्याचंही रक्षण होईल.

चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण

पावसाळ्यात रस्त्यावरील पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खायला सर्वांनाच आवडतं, उलट या ऋतूत या गोष्टी खाण्याची जास्त इच्छा होते. गरमागरम भजी, वडापाव, समोसा पाहून तोंडाला पाणी सुटतं. पण पावसाळ्यात चवीपेक्षा आरोग्याची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे.

चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण

पावसाळ्यात ओलावा आणि अस्वच्छतेमुळे बॅक्टेरिया, फंगस आणि व्हायरस वेगाने वाढतात, ज्यामुळे पोटाच्या समस्या, फूड पॉयझनिंग, डायरिया, टायफॉइड आणि हेपेटायटीस होऊ शकतं. अशा परिस्थितीत पावसाळ्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आरोग्याचंही रक्षण होईल.

चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण

पाणीपुरी, भेळपुरी, समोसा आणि टिक्की यासारख्या गोष्टी पावसाळ्यात खूप लवकर संक्रमित होतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या या पदार्थांमध्ये वापरले जाणारे पाणी स्वच्छ नसते आणि उघड्यावर ठेवलेल्या पदार्थांवर धूळ आणि जंतू सहजपणे जमा होतात.

चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण

पावसाळ्यात बाजारात कापलेली फळे आणि सॅलड खाऊ नका. ही तासनतास उघड्यावर राहतात आणि त्यावर बॅक्टेरिया किंवा बुरशी येण्याचा धोका जास्त असतो. यामुळे अन्नातून विषबाधा आणि पोटदुखी होऊ शकते.

चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण

पावसाळ्यात बाहेर उपलब्ध असलेले थंड पाणी किंवा बर्फाचा गोळा खाणं टाळा. त्यात वापरलेला बर्फ बहुतेकदा स्वच्छ पाण्यापासून बनवला जात नाही आणि त्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटीने वाढतो.

चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण

पावसात जास्त आर्द्रतेमुळे मशरूमवर फंगस खूप लवकर वाढतं. ते ताजे दिसतात, परंतु आतून खराब होऊ शकतात. खराब मशरूम खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होऊ शकतं.

चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण

पावसाळ्यात शरीराची पचन प्रक्रिया मंदावते. अशा परिस्थितीत, तेलकट आणि जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने पोटात गॅस आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात.

चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण

पावसाळ्यात छोटासा निष्काळजीपणा देखील खूप महागात पडू शकतो. या ऋतूत स्वच्छता आणि संतुलित आहार सर्वात महत्त्वाचा आहे.

चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण

जर तुम्हाला पावसाचा आनंद घ्यायचा असेल आणि आजारी पडू नये असे वाटत असेल, तर वर नमूद केलेल्या गोष्टींपासून दूर राहा आणि निरोगी राहा.