डोकं दुखलं-ॲसिडिटी झाली घे गोळी, मनानाचे औषधांचा मारा टाळा-नॅचरल पेनकिलर असलेले ‘हे’ पदार्थ खा
Updated:February 4, 2026 14:06 IST2026-02-04T13:56:15+5:302026-02-04T14:06:58+5:30

ॲसिडीटी, डोकेदुखी, पोटदुखी किंवा मासिक पाळीत पोटऱ्यांंमध्ये गाेळा येणे किंवा पोट आखडून जाणे असे काही त्रास सुरू झाले की अनेकजण लगेचच पेनकिलर घेऊन मोकळे होतात.
असं वारंवार पेनकिलर घेणं आरोग्यासाठी अतिशय घातक आहे, हे डॉक्टर वारंवार सांगतात. पण तरीही हे सगळं माहिती असूनही दुखणं थांबविण्यासाठी घाईघाईने पेनकिलर घेतली जाते.
पण पेनकिलर घेण्यापेक्षा काही फळं किंवा पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर लगेचच तुमचं दुखणं बरं होऊ शकतं (food items that works as a painkiller). त्यासाठी कोणती फळं कधी खावीत याविषयीची माहिती डॉक्टरांनी dr_rupali_lavate_ या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(have this food instead of pain killer)
जर तुमचं खूप डोकं दुखत असेल तर केळी खा. बऱ्याचदा ॲसिडीटी वाढल्यामुळेही डोकं दुखतं. ॲसिडीटी कमी करण्यासाठी केळी उपयुक्त ठरते.(best food options to reduce acidity, headache and other health issues)
जर पोट साफ होत नसेल, बद्धकोष्ठतेचा त्रास नेहमीच होत असेल तर काही दिवस नियमितपणे सफरचंद खाऊन पाहा. पोट साफ होण्यासाठी केळी खाणंही खूप फायदेशीर ठरतं.
सर्दी होण्याच्या आधी घसा खूप दुखतो. खवखव होते. हे थांबविण्यासाठी कोणतीही पेनकिलर न घेता मध खाऊन पाहा. लगेचच आराम वाटेल.
काही जणांच्या दाढ, दात नेहमीच दुखतात. अशावेळी लवंग खाणं खूप फायदेशीर ठरतं. खासकरून जो दात दुखतो आहे, त्या दातानेच काही वेळ लवंग दाबून धरावी. लवकरच बरं वाटतं.
खूप गळून गेल्यासारखं होत असेल किंवा थकवा, अशक्तपणा जाणवत असेल तर अशावेळी संत्री खा. त्यामध्ये असणारं व्हिटॅमिन सी, ऑक्सिडंट्स लगेच तुम्हाला एकदम फ्रेश करून टाकतील. अशावेळी लिंबूपाणी पिणंही खूप फायदेशीर ठरतं.
ज्यांना निद्रानाशाचा त्रास असतो त्यांनी काही दिवस नियमितपणे किवी खाऊन पाहावे.
कधी कधी खूप जेवण झालं तर पोट फुगल्यासारखं किंवा कडक झाल्यासारखं वाटतं आणि अस्वस्थ होतं. अशावेळी वाटीभर फ्रेश दही खाणं फायद्याचं ठरतं.
अपचनाचा त्रास होत असेल तर आलं खा किंवा आल्याचा काढा करून प्या.