1 / 7आपण रात्रभर उपाशी असतो आणि त्यानंतर जवळपास १० ते १२ तासांच्या गॅपनंतर आपण नाश्ता करतो. तो करताना आपण जर काही चुका केल्या तर त्यामुळे अपचन, ॲसिडीटी, गॅसेस असा त्रास होऊ शकतो. म्हणूनच नाश्ता करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते पाहूया..2 / 7डॉ. सौरभ सेठी यांनी याविषयीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये ते सांगतात की पहिली चूक म्हणजे नाश्ता टाळणं. वजन कमी करणारे कित्येक जण नाश्ता टाळतात. पण यामुळे डोकेदुखी, चिडचिड, ॲसिडीटी तर होतेच पण वजन वाढण्याचाही त्रास होतो. त्यामुळे नाश्ता टाळू नका.3 / 7नाश्त्यामध्ये कधीही बिस्किटं, पेस्ट्री, पॅनकेक, ब्रेडयुक्त पदार्थ खाऊ नका. यामुळे साखर, मैदा असे नको तेच पदार्थ तुमच्या पोटात जाऊन दिवसाची सुरुवात होते.4 / 7काही जण नाश्त्यामध्ये ग्लासभर दूध किंवा वेगवेगळे मिल्कशेक पितात. पण यामुळेही पोट जड होणे, अपचन, कॉन्स्टीपेशन असा त्रास होतो. कारण दूध सगळ्यांनाच पचते असे नाही.5 / 7नाश्त्याच्या आधी रिकाम्यापोटी कॉफी पिण्याची सवय असेल तर त्यामुळेही ॲसिडीटीचा खूप त्रास होऊ शकतो.6 / 7सकाळी खूप घाईगडबड असते. अशावेळी अनेकजण खूप गडबडीत नाश्ता करतात. त्यामुळे प्रत्येक घास व्यवस्थित न चावता तो तसाच गिळला जातो. यामुळेही अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि पचनाच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरू होतात.7 / 7पचनक्रिया चांगली राहण्यासाठी किंवा खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होण्यासाठी आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थ जास्तीतजास्त प्रमाणात असायला हवे. जर नाश्त्यामध्ये तुम्ही फायबरयुक्त पदार्थ कमी घेत असाल तर त्यामुळेही अपचन, गॅसेस, पोट जड होणे असे त्रास होतात.