1 / 6भरपूर चीज घातलेला पिझ्झा, बर्गर, सॅण्डविच असे पदार्थ खूप लोकांना आवडतात. ते हॉटेलमध्ये ऑर्डर देतानाही एक्स्ट्रा चीज मागून घेतात.2 / 6असं नेहमीच जर भरपूर चीज खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे कोलन कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो, असं तज्ज्ञ सांगत आहेत. 3 / 6Baylor College of Medicine US यांनी जो अभ्यास केला आहे, त्यानुसार जर तुम्ही नेहमीच खूप चीज खात असाल तर त्यामुळे तुमची पचन क्रिया, पोटाचे आरोग्य बिघडू शकते. असं वारंवार झालं तर त्यातून कोलन कॅन्सरचा त्रास उद्भवू शकतो. 4 / 6या अभ्यासात असंही सांगण्यात आलं आहे की जर खूप चीज नेहमीच खाल्लं तर पचनक्रियेसाठी उपयुक्त ठरणारे बॅक्टेरिया मारले जातात. त्यामुळे मग अपचन होते. पोटदुखी, डायरिया, पोट फुगणे असा त्रासही होतो. हा त्रास वारंवार होत राहिला तर आतड्यांमधल्या पेशी खराब होत जातात आणि त्यांच्यापासून ट्यूमर होण्याचा धोका वाढतो. 5 / 6The Baylor College researchers यांच्यावतीने ३४ लोकांचा जवळपास ३ ते ४ वर्षे सलग अभ्यास करण्यात आला. वारंवार त्यांचे आतडे, आतड्यांचे काम, पचनक्रिया या गोष्टी तपासण्यात आल्या. यामध्ये असं आढळून आलं की जे लोक जास्त प्रमाणात चीज खात होते त्या लोकांच्या शरीरातील Bacteroides आणि Subdoligranulum हे बॅक्टेरिया कमी झाले होते. हे बॅक्टेरिया पचनक्रिया, आतड्यांचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती यांच्यासाठी उपयुक्त ठरतात. 6 / 6डॉ. ली जियाओ यांच्यामते सॅच्युरेटेड फॅट्स जास्त प्रमाणात खाणाऱ्या लोकांना कोलन कॅन्सरचा धोका जास्त असतो आणि चीजमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स जास्त प्रमाणात असतात. कधीतरी चीज खायला हरकत नाही. पण तुम्ही जर रोजच तुमच्या पोटावर चीजचा मारा करत असाल तर तो मात्र थांबवायला हवा.