Join us

नाश्त्याला 'हे' पदार्थ खाणं टाळा- कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड वाढून हार्ट अटॅक येण्याचा धोका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 21:46 IST

1 / 5
काही पदार्थ जर तुम्ही रोजच नाश्त्याला घेत असाल तर ते तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे शरीरातलं कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड वाढू शकतं.
2 / 5
ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती टाईम्स ऑफ इंडिया रिपोर्टने दिली आहे. शुगर पॅक सिरील्स हल्ली बरेच जण नाश्त्याला खातात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. त्यामुळे ट्रायग्लिसराईडची पातळी वाढू शकते.
3 / 5
पेस्ट्री, मफिन्स, ब्रेड, पाव असे बेकरी पदार्थ नाश्त्यामध्ये घेणे टाळायला हवे. यामुळे शरीरात जास्त प्रमाणात शरीरासाठी योग्य नसलेले ट्रान्सफॅट्स जातात. त्यामुळे एल डी एल म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल वाढते.
4 / 5
पुऱ्यांसारखे तेलकट पदार्थ नेहमीच आहारात घेत असाल तर त्यामुळे सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट्स वाढू शकतात. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढते.
5 / 5
ग्लासभर दूध, भरपूर प्रमाणात चीज, पनीर, बटर असं सगळं एकदम खाणे टाळा. हे पदार्थ चवदार आणि हेल्दी असले तरी एकाच वेळेस एवढे सगळे पदार्थ खाणे कोलेस्टेरॉल वाढविणारे ठरू शकतात.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नहृदयविकाराचा झटकाहृदयरोग