1 / 8आलं आरोग्यासाठी फार चांगलं असतं. हे आपल्याला माहिती आहेच. आहारामध्ये आल्याचा समावेश असणे फार फायद्याचे ठरते. भाजीत, आमटीत सगळ्यात आलं आपण घालतो. आल्याचा काढा तसेच आल्याचा चहा आरोग्यासाठी फार चांगला. 2 / 8पण कधी सुंठ वापरता का? आले वाळवून त्याची सुंठ तयार केली जाते. ही सुंठ आल्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असते. अनेकदृष्ट्या उपयुक्त ठरणारी सुंठ पावसाळ्यात तर घरी वापरायलाच हवी. 3 / 8पावसाळ्यात आल्याचा चहा तर पिताच मात्र सुंठीचा छान कडक चहा पावसाळ्यात पिणे फार फायद्याचे ठरेल. सर्दी खोकला ताप पावसाळ्यात नुसता थैमान घालतात. सुंठीचा चहा प्यायल्याने आजार आटोक्यात राहतात. 4 / 8सुंठ उगाळून त्याचा लेप तयार करता येतो. हा लेप फार उपयुक्त असतो. अगदी गुणकारी असतो. त्यामुळे तो वापरणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल. पाहा किती फायदे असतात. 5 / 8सुंठीत अँण्टी इन्फ्लेमेटरी घटक असतात. ते वेदनाशामक असतात. त्यामुळे सुंठीचा लेप लावल्यामुळे हात, मान दुखत असल्यास आराम मिळतो. हा लेप स्नायूंसाठी फार उपयुक्त ठरतो. 6 / 8वाताचा त्रास अनेकांना असतो. वातामुळे डोके दुखते. तसेच इतरही अनेक त्रास होतात. सुंठीचा लेप वात खेचून घेतो. तसेच पित्ताचा त्रास होत असेल तरी हा लेप डोकेदुखी थांबवण्यात मदत करतो.7 / 8सुंठीच्या लेपामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. प्राणवायु शरीराला जास्त मिळतो आणि त्यामुळे थकवा जास्त जाणवत नाही. त्यामुळे सर्दीने नाक बंद झाल्यावर असा लेप लावायचा. नाक सुटते. 8 / 8सुंठीचा लेप तयार करायला अगदी सोपा आहे. त्यासाठी सुंठ उगाळायची. उगाळण्यासाठी पाणी वापरायचे. सुंठ पूड असेल तर थोड्या पाण्यात कालवायची आणि लावायची. हा लेप खास डोक्यालाच लावला जातो. झोपही छान लागते.