घाणेरडा कुबट वास येणारे कळकट मोजे न धुता घालता? दुर्गंधीने बेतेल जीवावर, पाहा ही सवय किती घातक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 16:22 IST
1 / 6How often should you wash socks after wearing : बऱ्याच लोकांना सवय असते की, ते तेच तेच कपडे न धुता पुन्हा पुन्हा वापरतात. कारण हे कपडे फार काही मळलेले किंवा खराब दिसत नाहीत. पण आपल्या कपाटात एक अशी गोष्ट असते जी न पुन्हा पुन्हा वापरल्यास त्रास होऊ शकतो. आम्ही ज्याबाबत सांगतोय ते आहेत मोजे म्हणजेच सॉक्स. दिवसभर पाय शूजमध्ये बंदिस्त असतात. ज्यामुळे घाम येतो. धूळ जमा होते आणि जेव्हा आपण शूज काढतो तेव्हा घामाच्या दुर्गंधीने डोकं गरगरतं. असं का होतं? असा प्रश्न अनेकांना पडतो. 2 / 6पायांमध्ये भरपूर स्वेट ग्लॅंड असतात. घामाला स्वत:चा असा काही गंध नसतो. पण घाम आणि डेड स्किन बॅक्टेरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा दुर्गंधी येऊ लागते. सॉक्स घामाला शोषूण घेतात. त्या ओलावा असल्याने त्यात फंगस आणि बॅक्टेरिया वाढतात. सॉक्समध्ये भरपूर धूळ आणि इतरही अनेक कीटाणू असतात.3 / 6एका रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, टी-शर्टच्या तुलनेत सॉक्समध्ये अधिक बॅक्टेरिया असतात. याचा अर्थ असा की, सॉक्स भलेही स्वच्छ दिसतात, पण त्यांमध्ये भरपूर बॅक्टेरिया आणि फंगस असतात.4 / 6मग या सॉक्समधील घाण, धूळ आणि बॅक्टेरिया केवळ पायांपर्यंत मर्यादित राहत नाहीत. ते आपला बेड, पाय, भांडी, भाज्या, सोफा घरात सगळीकडे पसरतात. असे न धुतलेले सॉक्स पुन्हा पुन्हा वापरले तर फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. 5 / 6त्यामुळे न धुतलेले सॉक्स पुन्हा पुन्हा वापरू नका. भलेही ते स्वच्छ दिसत असतील. पण लपलेली घाण आणि बॅक्टेरिया दिसत नसतात. पाय रोज साबणाने धुवावे आणि कापडाने पुसा. खासकरून बोटांच्या मधली जागा कोरडी ठेवा. 6 / 6सॉक्स चांगले स्वच्छ करण्यासाठी ते उलटे करून धुवावेत. सॉक्स धुण्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे गरम पाणी. याने बॅक्टेरिया आणि फंगस मरतात. जर थंड पाण्याने धुवत असाल तर सॉक्स उन्हात चांगले वाळत घाला.