1 / 8प्रवासाला जाताना लोकं छान खिडकीत बसून वातावरणाची आणि हवेची मज्जा घेत जातात. मात्र सगळ्यांच्याच नशीबात हे सुख नसतं. काही जणांना प्रवास करायचा म्हणजे त्रासच असतो. कारण त्यांना प्रवासात नुसत्या उलट्या होतात. पोटात मळमळतं आणि डोकं दुखून हैराण व्हायला होतं. 2 / 8मोशन सिकनेस गाडीतच होतो असे नाही तर झोपाळा किंवा हलत्या-डुलत्या सगळ्या जागांवर त्रास होतो. मात्र काही सोपे उपाय असतात जे करुन हा त्रास कमी करता येतो. प्रवास गोळी घ्यायची तर त्याने प्रचंड झोप येते त्यामुळे हे उपाय नक्की करुन पाहा. 3 / 8गोड गोळी चघळत राहणे फायद्याचे ठरते. गोड पदार्थांमुळे पोटात डचमळले तरी ते बाहेर येत नाही. तसेच आल्याचा रस, लिंबाचा रस याचा फायदा होतो. आल्याची गोळी प्रवासात खावी. आवळा सुपारी खावी. पित्ताचा त्रास टाळता येतो. 4 / 8प्रवासापूर्वी काहीही तेलकट, तूपकट खाणे टाळा. साधे जेवणच जेवायचे. उपमा , खिचडी असे पदार्थच खा. त्यामुळे घशाशी मसाला येत नाही आणि उलटी होत नाही. अगदी झालीच तर त्यामुळे घसा खवखवत नाही. 5 / 8प्रवासात मोबाइल सतत पाहू नका. त्यामुळे डोकं दुखतं आणि मळमळ वाढते. नजर फिरती ठेवायची. खिडकीतून बाहेर पाहत राहायचे. लक्ष विचलित होईल असे काही करा. गाणी ऐका किंवा गप्पा मारा. 6 / 8प्रवासात चिप्स, कुरकुरे, थंड पेय असे प्रकार खाणे अगदी सामान्य आहे. ते खाणे टाळायला हवे. प्रवासात काहीही खाऊ नका. फक्त गोळी चघळा किंवा लवंग चघळा. लवंग खाणे फायद्याचे ठरते. पोटातील मळमळ लवंगेच्या रसामुळे कमी होते. 7 / 8प्रवासाला जाण्याआधी काहीतरी खावे. रिकाम्या पोटी कधीही प्रवास करु नका. पोटात काही नसेल तरी त्रास होतो. अनेक जण उलटीच्या भीतीने उपाशी प्रवास करतात. त्याचा त्रास जास्त होतो. फळे खा. 8 / 8हवेशीर जागेत बसा. मागच्या सिटवर बसणे टाळा. मोकळी हवा मिळाल्यावर मळमळ कमी होते. प्रवासाचे वाहन हवेशीर असेल तर त्याचा त्रास शक्यतो नाही होत. खिडकीजवळ बसा नक्कीच त्रास कमी होईल.