पाळीच्या दिवसात मांड्यांमध्ये प्रचंड रॅश येते, आग होते? ७ गोष्टी, स्वच्छतेसह घ्या आरोग्याची काळजी

Published:January 5, 2023 05:33 PM2023-01-05T17:33:38+5:302023-01-05T18:11:57+5:30

Tips To Get Relief From Sanitary Pad Rashes During Periods : मासिक पाळीत स्वच्छता महत्त्वाचीच, आग होत असेल तर दुखणं अंगावर काढणं टाळा.

पाळीच्या दिवसात मांड्यांमध्ये प्रचंड रॅश येते, आग होते? ७ गोष्टी, स्वच्छतेसह घ्या आरोग्याची काळजी

मासिक पाळी म्हटलं की आपल्याला त्यामुळे होणारा त्रास आणि समस्यांच जास्त लक्षात राहतात. मासिक पाळी दरम्यान मूड स्विंग होणे, थकवा, वेदना, सूज येणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यासोबतच एक अशी समस्या आहे की ज्याने आपण मासिक पाळीदरम्यान हैराण होऊन जातो ती म्हणजे पीरियड रॅश. आपल्यापैकी बऱ्याचजणींना मासिक पाळीचे जितके टेन्शन येते त्यापेक्षा जास्त टेन्शन पीरियड रॅशने होणाऱ्या त्रासाचे येते. मुख्यतः नॅपकिन त्वचेवर घासल्यामुळे ही समस्या उद्भवते. पीरियड रॅशमुळे चालताना आणि उठण्या बसण्यातही त्रास होतो. सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराने जळजळ होऊन त्वचेवर लालसरपणा आणि खाज येण्याचीही शक्यता असते. हे रॅश उष्णता आणि आर्द्रतेमुळे होऊ शकतात. सॅनिटरी नॅपकिनमुळे होणारे रॅश पुढील ३ ते ४ दिवस त्रास देतात. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या रॅशपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय केले जाऊ शकतात. काय आहेत हे उपाय ते जाणून घेऊयात(Tips To Get Relief From Sanitary Pad Rashes During Periods).

पाळीच्या दिवसात मांड्यांमध्ये प्रचंड रॅश येते, आग होते? ७ गोष्टी, स्वच्छतेसह घ्या आरोग्याची काळजी

खोबरेल तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, याचा वापर केल्याने सॅनिटर नॅपकिन्समुळे होणाऱ्या रॅशपासून सुटका मिळते. जर तुमच्या जांघांमध्ये किंवा लघवीच्या जागी पुरळ आले असेल तर त्या भागावर खोबरेल तेल लावा. सॅनिटर नॅपकिन्सच्या वापरामुळे जर त्वचा कोरडी पडली असेल, तर खोबरेल तेलाच्या वापराने त्वचा मऊ होण्यास मदत होईल. रात्री झोपताना कापसाच्या मदतीने त्या भागावर खोबरेल तेल लावल्यास सकाळपर्यंत आराम मिळतो. जांघांमधील त्वचा काळी पडली असेल तर रोज त्या भागावर खोबरेल तेल लावल्यास त्वचा उजळण्यास मदत होते.

पाळीच्या दिवसात मांड्यांमध्ये प्रचंड रॅश येते, आग होते? ७ गोष्टी, स्वच्छतेसह घ्या आरोग्याची काळजी

ऐलोवेरा जेल लावल्याने तुम्हांला रॅशपासून होणाऱ्या त्रासाला आराम मिळू शकतो. कोरड्या हातावर ऐलोवेरा जेल घेऊन ज्या भागावर पुरळ किंवा लालसरपणा आला आहे त्या भागावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे तुम्हाला आराम पडू शकतो.

पाळीच्या दिवसात मांड्यांमध्ये प्रचंड रॅश येते, आग होते? ७ गोष्टी, स्वच्छतेसह घ्या आरोग्याची काळजी

जर तुमच्या जांघांमध्ये सूज आली असेल किंवा जळजळ होत असेल तर त्या भागावर बर्फ हलक्या हाताने फिरवावा. ज्याठिकाणी रॅश आले असतील त्या प्रभावित भागावरसुद्धा बर्फाने शेक द्यावा.

पाळीच्या दिवसात मांड्यांमध्ये प्रचंड रॅश येते, आग होते? ७ गोष्टी, स्वच्छतेसह घ्या आरोग्याची काळजी

मासिक पाळीमुळे होणारे रॅश बरे करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जाऊ शकतो. कडुनिंबाचे पाणी तयार करण्यासाठी २० ते २५ कडुलिंबाची पाने पाण्यात काही वेळ उकळा. सुरुवातीला तुम्ही जितके पाणी घेतले आहे त्याचा अर्धे होईपर्यंत हे पाणी उकळू द्या. नंतर पाणी थंड होऊ द्या. या पाण्याने बाधित भाग नीट धुवा. कडुनिंबाचे पाणी वापरल्याने रॅश, पुरळ आणि खाज येणे यांसारख्या समस्यांपासून सुटका होऊ शकते.

पाळीच्या दिवसात मांड्यांमध्ये प्रचंड रॅश येते, आग होते? ७ गोष्टी, स्वच्छतेसह घ्या आरोग्याची काळजी

रॅश, पुरळ आणि खाज येणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाने हलकेच मसाज करा.

पाळीच्या दिवसात मांड्यांमध्ये प्रचंड रॅश येते, आग होते? ७ गोष्टी, स्वच्छतेसह घ्या आरोग्याची काळजी

सॅनिटरी नॅपकिनच्या वापरामुळे जर तुमच्या जांघांमध्ये रॅश, पुरळ आले असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही अँटिबायोटिक पावडरचा वापर करू शकता.

पाळीच्या दिवसात मांड्यांमध्ये प्रचंड रॅश येते, आग होते? ७ गोष्टी, स्वच्छतेसह घ्या आरोग्याची काळजी

रॅश, पुरळ आणि खाज येणे यांसारख्या समस्यांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी व्हजायनल एरियाला स्वच्छ ठेवा. वरील सर्व पर्यायांचा वापर तर तुम्ही नक्कीच करू शकता. पण त्यासोबतच दिवसातून किमान दोन वेळा तरी जांघा आणि व्हजायनल एरियाला कोमट किंवा नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करा.