1 / 8आपल्याला अनेकदा प्लास्टिकचे डबे आणि बाटल्या वापरणे सोयीस्कर वाटते, पण प्लास्टिकचे डबे किंवा बाटली वापरणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम होऊ शकतो.2 / 8प्लास्टिकच्या डब्यात गरम पदार्थ ठेवल्यास उष्ण पदार्थांचे आणि रसायनांचे मिश्रण होऊ शकते. जे शरीरात गेल्यावर हार्मोनल असंतुलन व पचनासंबंधी समस्या निर्माण करू शकतात.3 / 8दीर्घकाळ प्लास्टिकच्या डब्यात पाणी किंवा जेवण ठेवले तर त्यातील हानिकारक घटक हळूहळू पदार्थात मिसळतात आणि त्यामुळे मूत्रपिंड व यकृतावर ताण येऊ शकतो.4 / 8सूर्यप्रकाशात किंवा उष्णतेत ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी गरम होऊन रासायनिक बदल होतो, ज्यामुळे ते पाणी प्यायल्याने आरोग्यासाठी धोक्याचे ठरु शकते.5 / 8मुलांच्या आरोग्यासाठी प्लास्टिक अत्यंत धोकादायक असते. लहान मुलांना प्लास्टिकच्या बाटल्या, डबे किंवा खेळणी देऊ नयेत कारण त्यांचे शरीर विषारी घटक सहन करण्यासाठी तयार नसते आणि अधिक संवेदनशील असते.6 / 8प्लास्टिकच्या अति वापरामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, त्यामुळे लहान-सहान आजार वारंवार होण्याची शक्यता वाढते.7 / 8पर्यावरणासाठीही प्लास्टिक चांगले नाही. तर आपल्या आरोग्यासाठी कसे असेल? डबे आणि बाटल्या विघटन न होता वर्षानुवर्षे पडून राहतात आणि माती व पाणी दोन्ही दूषित करतात.8 / 8त्यामुळे स्टील, काचेचे किंवा मातीचे डबे व बाटल्या वापरणे अधिक सुरक्षित आणि टिकाऊ ठरते आरोग्याचं रक्षण होतं आणि पर्यावरणालाही फायदा होतो. प्लास्टिक वापरणे टाळायचे म्हणजे फक्त पिशव्याच नाही तर डबे व बाटल्याही टाळा.