Join us

Diabetes Signs in Kids : मुलांनाही डायबिटिसचा धोका-ओळखा ७ लक्षणं, मुलांचं वजन वाढत असेल तर व्हा सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 09:05 IST

1 / 8
मधुमेहाचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. बिघडलेली जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा इत्यादींमुळे होऊ शकतो. काही वेळा हा आजार आनुवंशिक कारणांमुळेही होतो.(Diabetes signs in kids)
2 / 8
जर घरात मधुमेहाचा आजार कोणाला असेल तर मुलांना देखील होण्याची दाट शक्यता असते. मधुमेहाची लक्षणे मुलांमध्ये कशी ओळखायची पाहूया. (7 diabetes symptoms)
3 / 8
जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा मूल सामान्यपेक्षा जास्त वेळा लघवी करते.
4 / 8
वारंवार लघवी झाल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी मुलांना सतत तहान लागते.
5 / 8
योग्य आहार घेऊन किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतरही बाळाचे वजन कमी होत असेल तर सावध रहा, मधुमेहाचा आजार असू शकतो.
6 / 8
रक्तातील साखरेची प्रमाण वाढल्यामुळे मुलांची ऊर्जेची पातळी कमी होते. त्यामुळे त्यांना थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो.
7 / 8
मधुमेहाचा मुलांच्या डोळ्यांवरही परिणाम होतो. ज्यामुळे त्यांना धूसर दिसते.
8 / 8
खेळताना लागल्यास किंवा पडल्यास दुखापत लवकर बरी होत नसेल तर हे मधुमेहाचे लक्षण समजावे, अशावेळी डॉक्टरांचे मत घ्या.
टॅग्स : आरोग्यलहान मुलंमधुमेह