1 / 7महिलांच्या आरोग्यामध्ये प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिले जाते. अनेकदा आपण जितकी त्वचेची किंवा केसांची काळजी घेतो तितकीच या भागाची काळजी घेत नाही. आपल्याला वाटते की आपण खूप 'स्वच्छ' राहत आहोत, पण आपल्या याच'गुड हॅबिट्स' (Good Habits) खाज, जळजळ आणि गंभीर इन्फेक्शनला निमंत्रण देत असतात. (Safe ways to clean private parts for females)2 / 7जर आपल्यालाही वाटत असेल की आपण सर्व काही योग्य करत आहोत, तरीही आपल्याला वारंवार खाज किंवा दुर्गंधीचा त्रास होत असेल, तर आपण स्वच्छतेच्या चुकीच्या सवयी पाळत असण्याची शक्यता जास्त आहे. प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेच्या अशा कोणत्या ५ चुका आहेत ज्या आपण सुधारणे आवश्यक आहे पाहूया. (Vaginal health and hygiene tips)3 / 7अनेक महिलांना वाटते की सुगंधी साबण वापरल्याने दुर्गंधी येणार नाही. पण इंटीमेट एरियाची त्वचा अतिशय नाजूक असते. सामान्य साबण किंवा बॉडी वॉशमध्ये पॅराबेन्स आणि सल्फेट्स सारखी रसायने असतात. जी नैसर्गिक पीएच संतुलन बिघडवतात, यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. 4 / 7सॅटिन किंवा लेस असलेल्या अंडरवेअर दिसायला सुंदर असल्या तरी यामुळे घाम आणि आर्द्रता निर्माण होते. जी फंगल इन्फेक्शन वाढवण्याचे काम करते. त्यासाठी कॉटनच्या पॅन्टी वापरणं केव्हाही फायद्याचे. 5 / 7डचिंग म्हणजे पाण्याचा जोरात फवारा मारुन प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करणं. पण योनीमार्ग हा सेल्फ क्लीनिंग अवयव आहे. तो स्वत:ला स्वच्छ ठेवण्यास सक्षम असतो. पाण्यामुळे नैसर्गिक ओलावा आणि चांगले बॅक्टेरिया निघून जातात, ज्यामुळे कोरडेपणा आणि खाज येते. 6 / 7मासिक पाळीदरम्यान किंवा इतर वेळीही पँटी लायनर्स ५ ते ६ तासांपेक्षा जास्त वेळ वापरणे धोक्याचे ठरते. रक्त किंवा घाम जास्त वेळ त्वचेच्या संपर्कात राहिल्याने रॅशेस आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ शकते. त्यासाठी दर ४ ते ५ तासानंतर पॅड बदलायला हवे. 7 / 7अनेकदा प्रायव्हेट पार्टची स्वच्छता राखण्यासाठी आपण ऑनलाइन प्रॉडक्ट्स खरेदी करतो. या तीव्र रासायनिक उत्पादनामुळे योनीमार्गाच्या पीएच संतुलनात बिघाड होऊन संसर्ग आणि जळजळ वाढते.