Diwali Cholesterol Control Tips : भरपूर फारळ खाऊनही अजिबात वाढणार नाही कोलेस्टेरॉल; वाचा काय खायचं, काय टाळायचं
Updated:October 23, 2022 12:11 IST2022-10-23T11:51:32+5:302022-10-23T12:11:44+5:30
Cholesterol Control Tips : सणांच्या दिवसात दही आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा किंवा उकडलेले अन्नपदार्थ खा जेणेकरून तुमच्या शरीराला निरोगी आहार मिळेल.

दिवाळी (Diwali 2022) किंवा कोणत्याही सणाच्यावेळेस गोडधोड पदार्थ पोटभर खाल्ले जातात. अशावेळ वजन वाढणं, कोलेस्टेरॉल वाढणं यांसारख्या समस्या वाढत जातात. (Health Tips) कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. कमी घनता लिपोप्रोटीन (LDL) म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल आणि लिपोप्रोटीन (HDL) म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल. (How to manage cholesterol)
वरिष्ठ कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. आकांक्षा सिंग सांगतात की आपल्या आहारात कोलेस्टेरॉलचे काही प्रमाणात सेवन करणे सुरक्षित आहे. आपले शरीर आपल्याला आवश्यक असलेले कोलेस्टेरॉल बनवते. त्यामुळे अन्नपदार्थातून त्याचे सेवन करणे आवश्यक नाही. (Cholesterol Control Tips)
दिवाळीत कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका कितपत?
सण-उत्सवात लोक अनेक अनारोग्यकारक पदार्थ खातात. सणांदरम्यान आरोग्याच्या सर्वात सामान्य समस्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींशी संबंधित असतात. यामुळे पचन आणि हृदयाच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
ओव्हर इटिंग करू नका
दिवाळी हा भारतातील एक फार मोठा सण आहे, जो मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या वेळी लोक एकमेकांना भेटतात, शुभेच्छांची देवाणघेवाण करतात आणि मिठाई आणि स्वादिष्ट पदार्थ खातात. सणासुदीच्या प्रसंगी जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने अॅसिडिटी आणि अल्कोहोल-संबंधित समस्या होतात. आधीच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखर, बीपी आणि कोलेस्टेरॉलची पातळी खूप वाढते.
खराब कोलेस्टेरॉल रोखण्यासाठी काय करायचं?
1) काजू, नट आणि फळे खा.
2) भरपूर पाणी आणि ताज्या फळांचे रस प्या.
3) सणांच्या दिवसात दही आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा किंवा उकडलेले अन्न खा जेणेकरून तुमच्या शरीराला निरोगी आहार मिळेल.
4) मोहरीचे तेल किंवा तूप वापरावे.
5) आपल्या आहारात निरोगी चरबीचा समावेश करा.
6) दररोज 7-8 तासांची झोप घ्या,