हाडांना भरपूर कॅल्शियम देतात रोजच्या आहारातले ६ पदार्थ; नियमित खा, ठणकणार नाहीत हाडं

Published:August 4, 2022 11:42 AM2022-08-04T11:42:41+5:302022-08-04T12:01:43+5:30

Bone and Joint Day 2022 Calcium Rich Foods : केळी मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. मॅग्नेशियम हाडे आणि दातांची रचना तयार करण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व आहे.

हाडांना भरपूर कॅल्शियम देतात रोजच्या आहारातले ६ पदार्थ; नियमित खा, ठणकणार नाहीत हाडं

मजबूत हाडांसाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे.(Food for Healthy bones) हाडे निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने पुरेसे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. संतुलित आहार घेतल्याने तुम्हाला निरोगी हाडांसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळण्यास मदत होते. चांगल्या हाडांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. (Calcium Rich Foods) सामान्य स्थितीत, प्रौढांना दररोज 700 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. (6 calcium rich foods in diet to make your bones healthy)

हाडांना भरपूर कॅल्शियम देतात रोजच्या आहारातले ६ पदार्थ; नियमित खा, ठणकणार नाहीत हाडं

यासाठी तज्ज्ञ दररोज संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात. दूध, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या जसे की ब्रोकोली, कोबी आणि भेंडी इत्यादी, सोयाबीन, मासे हे कॅल्शियमचे उत्कृष्ट स्रोत आहेत.(According to orthopedic doctor include these 6 calcium rich foods in diet to make your bones healthy and strong)

हाडांना भरपूर कॅल्शियम देतात रोजच्या आहारातले ६ पदार्थ; नियमित खा, ठणकणार नाहीत हाडं

आज, 4 ऑगस्ट (Bone and Joint Day 2022) हाडे आणि सांधे दिन, डॉ. बिरेन नाडकर्णी (सीताराम भरतिया इन्स्टिट्यूट आणि फॅमिली हॉस्पिटल, दिल्ली येथील वरिष्ठ ऑर्थोपेडिक सल्लागार आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन) यांनी चांगल्या हाडांसाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा याबद्दल सांगितले आहे.

हाडांना भरपूर कॅल्शियम देतात रोजच्या आहारातले ६ पदार्थ; नियमित खा, ठणकणार नाहीत हाडं

कॅल्शियम भरपूर असलेल्या हिरव्या पालेभाज्या दात आणि हाडे तयार करण्यास मदत करतात. एक कप उकडलेला पालक शरीराच्या दैनंदिन गरजेच्या २५ टक्के कॅल्शियम पुरवू शकतो. फायबर समृद्ध असलेल्या या पानांमध्ये व्हिटॅमिन ए आणि लोह देखील मुबलक प्रमाणात असते. ज्याद्वारे तुमच्या शरीराला आणि हाडांना चांगले पोषण मिळू शकते.

हाडांना भरपूर कॅल्शियम देतात रोजच्या आहारातले ६ पदार्थ; नियमित खा, ठणकणार नाहीत हाडं

केळी मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. मॅग्नेशियम हाडे आणि दातांची रचना तयार करण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व आहे. हाडे मजबूत होण्यासाठी दररोज केळीचे सेवन केले पाहिजे. कमकुवत हाडांची समस्या दूर करण्यासाठी दररोज एक केळी प्रभावी ठरू शकते.

हाडांना भरपूर कॅल्शियम देतात रोजच्या आहारातले ६ पदार्थ; नियमित खा, ठणकणार नाहीत हाडं

नट्समध्ये कॅल्शियम असते, परंतु त्यात मॅग्नेशियम आणि फॉस्फरस देखीलअसतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. मॅग्नेशियम हाडांमध्ये कॅल्शियम शोषण्यास मदत करते. जर तुम्हाला तुमच्या वयानुसार हाडे मजबूत ठेवायची असतील तर नट्स चांगले पोषण देऊ शकतात.

हाडांना भरपूर कॅल्शियम देतात रोजच्या आहारातले ६ पदार्थ; नियमित खा, ठणकणार नाहीत हाडं

दूध, दही आणि चीज यांसारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते. जे हाडांच्या मजबुती आणि संरचनेसाठी सर्वात महत्वाचे जीवनसत्व आहे. एक कप दूध आणि एक कप दही हे कॅल्शियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत जे आपण दररोज घेऊ शकता.

हाडांना भरपूर कॅल्शियम देतात रोजच्या आहारातले ६ पदार्थ; नियमित खा, ठणकणार नाहीत हाडं

ताज्या संत्र्याचा रस शरीराला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी प्रदान करतो, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते संत्र्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असेही सांगितले जाते.

हाडांना भरपूर कॅल्शियम देतात रोजच्या आहारातले ६ पदार्थ; नियमित खा, ठणकणार नाहीत हाडं

आपल्या आहारातून योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळणे आपल्याला कठीण जाते. म्हणूनच मजबूत हाडांसाठी आपल्याला सूर्यप्रकाशापासून हे जीवनसत्व डी मिळू शकते. पहाटे कोवळ्या उन्हात फिरणे हा उत्तम पर्याय असू शकतो. आपण दररोज सूर्यप्रकाशात सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी बनवू शकतो. व्हिटॅमिन डी असलेली औषधे देखील बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्यांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.