Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला दिसून येतात 'ही' लक्षणं, पण ९० टक्के महिला करतात त्याकडे दुर्लक्ष...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2026 17:16 IST

1 / 6
ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये प्रचंड वाढत आहे. कोणताही आजार एकदम होत नाही. आपलं शरीर त्याआधी आपल्याला काही सूचना देत असतं. तसंच काहीसं ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीतही होतं. पण अज्ञानामुळे किंवा स्वत:च्या दुखण्याखुपण्याकडे दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे भारतीय महिला काही त्रास होऊनही तो अंगावर काढतात आणि त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर पसरत जातो.
2 / 6
कॅन्सर हा असा आजार आहे की जेव्हा तो सुरुवातीच्या टप्प्यात असतो, तेव्हाच त्यावर तातडीने उपचार घ्यावेत. जेणेकरून रुग्ण त्यातून पूर्णपणे बरा होऊन बाहेर येऊ शकतो. म्हणूनच ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला दिसणारी ही काही लक्षणं प्रत्येक स्त्रीला माहितीच असावीत..
3 / 6
पहिलं लक्षण म्हणजे स्तनांमध्ये अचानक जडपणा वाटू लागणं. एखादा स्तन जड झाल्यासारखा वाटला तर स्वस्तन चाचणी करा. आत कुठे गाठ लागते आहे का ते तपासा आणि तसं असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
4 / 6
डॉ. अरुण गिरी यांनी हेल्थसाईटला दिलेल्या माहितीनुसार ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला स्तन आणि स्तनाग्रांचा रंगही नेहमीपेक्षा वेगळा दिसते.
5 / 6
तसेच स्तनाग्र आत ओढल्यासारखे वाटतात. असं काही लक्षण दिसलं तर वेळ न घालवता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
6 / 6
चौथं लक्षण म्हणजे स्तनाग्रांमधून पाणी येणं. हे खूप धोक्याचं लक्षण आहे. ते ब्रेस्ट कॅन्सरमुळेच होतं असं नाही. पण तरीही असं काही तुमच्या बाबतीत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही उत्तम.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकर्करोगस्तनाचा कर्करोग