Join us

अपचनाचा नेहमीचाच त्रास- पोट फुगून गच्च होतं? रात्री झोपण्यापुर्वी करा ३ उपाय- सकाळी पोट साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2025 09:30 IST

1 / 5
अपचनाचा त्रास तुम्हाला नेहमीच होत असेल तर हे काही उपाय नक्कीच उपयोगी येऊ शकतात.
2 / 5
काही जणांना नेहमीच कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो, तर काही जणांना गॅसेस होतात. पोट फुगून जड झाल्यासारखं होतं. हा त्रास कमी करण्यासाठी डॉ. हंसा योगेंद्र यांनी सांगितलेले काही उपाय निश्चितच फायदेशीर ठरू शकतात.
3 / 5
त्यांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे रात्री झोपण्यापुर्वी १ चमचा जिरे १ ग्लास पाण्यात भिजत घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. रोज सकाळी जिऱ्याचा काढा घेऊनही तुम्ही हा उपाय करू शकता.
4 / 5
पचनाच्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी बडिशेपचे पाणीही खूप उपयुक्त ठरू शकते. हा उपाय करण्यासाठी एक चमचा बडीशेप १ ग्लास पाण्यात रात्रीच भिजत घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा आणि १० ते १२ मिनिटे उकळवून घ्या. यानंतर रिकाम्या पोटी हे पाणी गरम असतानाच प्या. पोट साफ होईल.
5 / 5
दिवसाची सुरुवात जर १ ग्लास कोमट लिंबू पाणी घेऊन केली तरीही पचनाच्या कित्येक समस्या कमी होऊ शकतात, असं डॉ. योगेंद्र सांगतात.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी