उन्हाळ्यात लालचुटुक कलिंगड खाताच, पण करु नका 'या' ७ चुक! पोटदुखी छळेल आणि...
Updated:April 26, 2025 20:15 IST2025-04-26T19:55:59+5:302025-04-26T20:15:49+5:30
Avoid These Mistakes While Eating Watermelon To Stay Healthy : Don't make these 7 mistakes while eating watermelon : 7 Mistakes to Avoid When Eating Watermelon : कलिंगड चवीला चांगलं लागतं, पण खाताना या चुका करु नका - नाहीतर तब्येत बिघडेल वारंवार...

उन्हाळ्यात लालचुटुक कलिंगड खायला सगळ्यांनाच आवडतं. चवीला गोड, रसाळ कलिंगड (Avoid These Mistakes While Eating Watermelon To Stay Healthy) उन्हाळ्यात खाण्याचे बरेच फायदे आहेत. कलिंगड, उन्हाळ्यातील वाढती उष्णता, रणरणते ऊन यामुळे शरीराला आतून थंडावा देण्याचे काम करते. उन्हाळ्यात कलिंगड खाणे फायदेशीर असले तरीही ते योग्य प्रमाणातच खाणे फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात कलिंगड खाताना आपण नकळतपणे लहान मोठ्या चुका (Don't make these 7 mistakes while eating watermelon) करतो. ज्यामुळे कलिंगड खाण्याचे फायदे मिळण्याऐवजी आरोग्याचे नुकसानच होते. यामुळे कलिंगड (7 Mistakes to Avoid When Eating Watermelon) खाताना कोणत्या चुका करु नयेत ते पाहूयात.
चूक १ :- उपाशी पोटी कलिंगड खाणे :-
कलिंगडामध्ये नैसर्गिक साखर आणि पाण्याचे प्रमाणात जास्त असते. रिकाम्या पोटी ते खाल्ल्याने अॅसिडिटी होऊ शकते, पोटदुखी आणि पचनक्रिया देखील बिघडू शकते. सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी कलिंगड खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढू शकते. यामुळेच चुकूनही उपाशी पोटी कलिंगड खाऊ नका.
चूक २ :- कलिंगड रोज जास्त प्रमाणांत खाणे :-
कलिंगड रोज जास्त प्रमाणांत खाल्ल्याने पोट आणि एकूणच आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरु शकते. कलिंगड खाण्यासाठी हलके असल्याने, ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते. त्यात फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अॅसिडिटी, पोट फुगणे आणि लूज मोशन यांसारख्या समस्या सतावू शकतात.
चूक ३ :- रोजच्या जेवणासोबत कलिंगड खाणे :-
काहीजण जेवणासोबत फळं खातात. परंतु रोजच्या जेवणासोबत चुकूनही कलिंगड खाऊ नये. रोजच्या जेवणासोबत कलिंगड खाल्ल्याने त्याचा पचनावर परिणाम होतो. यामुळे पोटात फर्मेंटेशन होऊ शकते, ज्यामुळे गॅस आणि अस्वस्थता वाढू शकते. जेवणाच्या किमान १ तास आधी किंवा नंतर आपण कलिंगड खाऊ शकता.
चूक ४ :- दुग्धजन्य पदार्थांसोबत कलिंगड खाणे :-
काहीजण कलिंगडाचे मिल्कशेक, सरबतं किंवा फ्रुटकस्टर्ड तयार करून खातात. कलिंगड, दूध किंवा दही यांसारख्या पदार्थांसोबत एकत्र खाल्ल्याने शरीरात विषारीपणा आणि ऍलर्जी सारख्या समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदानुसार, दुधासोबत कलिंगड खाल्ल्याने ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
चूक ५ :- कलिंगड फ्रिजमध्ये ठेवून थंडगार करून खाणे :-
खूप थंडगार कलिंगड खाल्ल्याने घसा खवखवणे आणि टॉन्सिल्सची समस्या सतावू शकते. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांसाठी अशा प्रकारे फ्रिजमध्ये ठेवलेले थंडगार कलिंगड खाणे हानिकारक आहे. रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढल्यानंतर लगेच टरबूज खाल्ल्याने पचनसंस्था कमकुवत होऊ शकते आणि पोटात गॅस तयार होण्याची शक्यता देखील वाढते. कलिंगड फ्रिजमधून बाहेर काढून रुम टेम्परेचरला आल्यावरच खावे. कलिंगड फ्रिजमधून काढून १० ते १५ मिनिटे बाहेर ठेवल्यानंतरच खावे.
चूक ६ :- रात्रीच्या वेळी कलिंगड खाणे :-
रात्रीच्या वेळी कलिंगड खाल्ल्याने चयापचय क्रियेचा वेग मंदावतो, ज्यामुळे ते योग्यरित्या पचू शकत नाही. यामुळे पोटात जडपणा, गॅस होणे आणि वारंवार लघवीची समस्या सतावू शकते. यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी कलिंगड खाणे टाळावे.
चूक ७ :- कलिंगड कापून ठेवणे आणि खूप वेळाने खाणे :-
कापलेले कलिंगड जास्त वेळ उघडे किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यात बॅक्टेरिया आणि बुरशी लवकर वाढू शकतात, यामुळे विषबाधा होऊ शकते. कलिंगड सारख्या रसाळ फळांमध्ये जास्त ओलावा आणि आर्द्रता असते, ज्यामुळे ते लवकर खराब होतात. शक्य असल्यास, ते कापल्यावर हवाबंद डब्यात स्टोअर करा आणि १ ते २ तासांच्या आत खाऊन संपावा.
कलिंगड नेहमी दिवसा खावे, शक्यतो दुपारी, जेव्हा पचनसंस्था उत्तम प्रकारे कार्य करते अशावेळी कलिंगड खाणे योग्य राहील. नेहमी ताजे आणि स्वच्छ कलिंगडच खावे. एक निरोगी व्यक्ती दिवसातून १ ते २ कप (सुमारे १५०-२५० ग्रॅम) कलिंगड खाऊ शकते.