Join us

‘ही’ औषधे घेत असाल तर चुकूनही पिऊ नका कॉफी, वाढेल शुगर आणि तब्येत अजून बिघडेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 16:42 IST

1 / 8
हल्ली चहा-कॉफीचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. परंतु, सतत कॅफिनचे सेवन केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कमी प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. (avoid coffee with these medicines)
2 / 8
अनेकदा आपण कॉफीचे सेवन चुकीच्या पद्धतीने केल्यास आरोग्य बिघडते. औषधे घेताना किंवा इतर काही पदार्थांसोबत कॉफी प्यायल्याने इंफेक्शन वाढते. (side effects of coffee with medication)
3 / 8
सर्दी- खोकला झाल्यानंतर आपण औषधांसोबत कॉफी पितो. यामुळे मेंदूच्या पेशींना उत्तेजित होतात.ज्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात.
4 / 8
आपण डिप्रेशनची औषधे घेत असू तर त्या सोबत कॉफी पिऊ नका. कॅफिन आणि औषधांमुळे पचनावर परिणाम होतो. ज्यामुळे रक्तदाबाचा धोका अधिक वाढतो.
5 / 8
कॉफी प्यायल्याने रक्तातील साखर वाढते. ज्यासाठी कॅफिन जबाबदार असते. मधुमेह असणाऱ्या लोकांना औषधांसोबत कॉफी पिऊ नये.
6 / 8
आपण अँटीबायोटिक्स घेत असू तर त्या सोबत कॉफी पिऊ नका. ही औषधे कॅफिन चयापचय रोखू शकतात. ज्यामुळे रक्तातील कॅफिन वाढून हदयाची गती वाढते.
7 / 8
रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत कॉफी पिऊ नका. यामुळे औषधांचा विपरीत परिणाम होऊन जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.
8 / 8
थायरॉईड औषध, अल्झायमर औषध, ऑस्टियोपोरोसिस औषध, अँटीसायकोटिक, दमा, एडीएचडी सारख्या औषधांसोबत कॉफी पिऊ नका.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स