1 / 9हल्ली आपण आजुबाजुला पाहातोच आहोत आणि कित्येक जण स्वत:च्या अनुभवातूनही हे लक्षात घेत आहेत की सध्याच्या काळात कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लागत आहेत.2 / 9बीपी, मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, लठ्ठपणा, विस्मरण, पाठदुखी, गुडघेदुखी, केस पांढरे हाेणं, थकवा येणं असे कित्येक त्रास हल्ली कमी वयातच मागे लागत आहेत. यासाठी अशा काही गोष्टी जबाबदार आहेत ज्या आपण रोजच्यारोज करतो आणि वेगवेगळे आजार स्वत:हून आपल्याकडे ओढून घेतो.3 / 9कमी वयातच अशी वेगवेगळी दुखणी मागे लागून घ्यायची नसतील तर कोणत्या गोष्टी करणं टाळायला हवं याविषयी माहिती सांगणारी पोस्ट आहारतज्ज्ञांनी dietician_mansi या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 4 / 9यामध्ये त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे झोपेच्या बाबतीत तडजोड नको. दररोजच रात्री तुमची अपुरी झोप होत असेल तर ते टाळा आणि ८ तासांची पूर्ण झोप घ्या. 5 / 9वेळ नाही म्हणून किंवा इतर कोणत्या कारणांमुळे नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण घेण्यात टाळाटाळ करू नका. या तीन जेवणांच्या वेळा अगदी कटाक्षाने पाळा.6 / 9खूप जास्त व्यायाम करणे किंवा अजिबातच व्यायाम न करणे या दोन्ही गोष्टी टाळायला हव्या. दररोज अर्धा ते पाऊण तास व्यायाम नियमितपणे करा.7 / 9कामाच्या वेळाही नियंत्रित ठेवा. काही जणांना १२- १३ तास सलग बसून काम करावे लागते. एवढे जास्त काम करणे तुम्हाला मानसिक आणि शारिरीक दृष्टीने थकवणारे ठरते.8 / 9सतत ताण घेऊन जगू नका. दररोज १५ मिनिटे मेडिटेशन करा. यामुळे मन शांत होते. मनाची मरगळ, डिप्रेशन, एन्झायटी हा सगळा त्रास कमी होऊन रिलॅक्स वाटते. मन शांत झालं की आपोआपच शरीरही थोडे रिलॅक्स होते.9 / 9नवं काहीतरी सतत वाचत राहा. यामुळे डोक्यालाही चालना मिळते. थोडा विरंगुळा मिळाला तर शरीर आणि मन ताजेतवाणे होऊन अधिक जोमात काम करते.