Join us   

Amla Health Benefits : थंडीत सर्दी, खोकला तब्येतीच्या कुरबुरी सुरूच आहेत? 'सुपर फ्रूट' आवळा खाल तर चुटकीसरशी आजार होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 11:27 AM

1 / 7
आवळा (Amla) औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे हे तुम्ही ऐकूनच असाल. हिवाळ्यात आवळ्याचं सेवन शरीराच्या तक्रारींना लांब ठेवण्यासाठी (Health Benefits of Amla) फायदेशीर ठरतं. आवळ्यातील औषधी गुणधर्मांमुळे त्याला 'सुपर फ्रुट' चा दर्जा मिळाला आहे. आवळा भारतासह आसपासच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते. 100 ग्रॅम ताज्या आवळ्यामध्ये 20 संत्र्याइतके व्हिटॅमिन सी असते आवळ्याची चव तुरट असते. म्हणून अनेक घरात आवळ्याचं लोणचं, मोरावळा बनवला जातो.
2 / 7
वेबएमडीच्या रिपोर्टनुसार आवळ्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासोबत आवळ्याचे सेवन मेंदूसाठीही खूप फायदेशीर आहे.
3 / 7
आवळ्यामध्ये सोल्यूबल फायबर भरपूर असते जे शरीरात वेगाने विरघळते. त्याच्या मदतीने शरीरातील साखर शोषण्याची गती कमी होते. यामुळे रक्तातील झपाट्याने वाढणारी साखरही कमी होते. टाईप 2 मधुमेहाच्या रूग्णांसाठी देखील हे खूप फायदेशीर आहे.
4 / 7
बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी आवळ्याचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या नियमित सेवनाने इरिटेबल बोवेल सिंड्रोम देखील टाळता येतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीरातील इतर पोषक तत्वे शोषून घेण्यासही मदत करते.
5 / 7
आवळ्याचे नियमित सेवन डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. त्यात व्हिटॅमिन ए देखील मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन ए केवळ डोळ्यांसाठीच फायदेशीर नाही तर ते वय-संबंधित मॅक्युलर (Age Related Macular Degeneration) डिजेनेरेशनचा धोका देखील कमी करते.
6 / 7
कोरोना महामारीमुळे लोकांमध्ये त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीबाबत बरीच जागरूकता निर्माण झाली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लोक विविध उपाय करत आहेत. आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी तसेच पॉलिफेनॉल, अल्कलॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स पुरेशा प्रमाणात असतात जे चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक असतात.
7 / 7
आवळा खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारण्यासही मदत होते. आवळयाचे सेवन मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढून स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलअन्न