1 / 10आहारात विविध गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचा समावेश असणे फार गरजेचे आहे. असे काही पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात असतात. जे आपण फक्त कधी तरी अन्नात घालतो. मात्र ते आरोग्यासाठी फार उपयुक्त असतात.2 / 10पांढरे तीळ घरात असतातच. मात्र ते फक्त पराठ्यावर घालायला. तसेच एखाद्या चटणीत घालण्यासाठीच आपण वापरतो. इतर वेळी त्याचा फार काही वापर करत नाही. 3 / 10मात्र हे तीळ आरोग्यासाठी फार फायद्याचे असतात. त्यामुळे ते फक्त फोडणीसाठी वापरण्यापेक्षा भाजीत तसेच चपातीच्या पीठात घालायला सुरवात करा. तीळ आहारात वारंवार घेतल्याने विविध फायदे मिळतात. 4 / 10पांढरे तीळ अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. त्यात कॅल्शियम असते, मॅग्नेशियम असते. जीवनसत्त्व 'इ' असते तसेच जीवनसत्त्व 'बी६' असते. इतरही काही सत्वे असतात. 5 / 10तीळात फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे तीळ खाल्याने पचनाची क्रिया सुरळीत होते. बद्धकोष्टतेचा त्रास होत नाही तसेच इतरही पोटाचे त्रास होत नाहीत. 6 / 10तीळात फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे तीळ खाल्याने पचनाची क्रिया सुरळीत होते. बद्धकोष्टतेचा त्रास होत नाही तसेच इतरही पोटाचे त्रास होत नाहीत. 7 / 10शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तीळ उपयुक्त ठरतात. त्यामुळे हृदयासाठी हे तीळ चांगले असतात. 8 / 10केसांसाठी तीळ गुणकारी असतात. केस गळणे कमी होते. तसेच पांढरे केसांचे प्रमाण वाढत नाही. चमकदार केसांसाठी या तीळाचे विविध प्रॉडक्ट्स मिळतात. 9 / 10सांधेदुखी कमी करण्यासाठी तीळाचा उपयोग होतो. तीळात अँण्टी ऑक्सिडंट्स असतात तसेच अँण्टी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे तीळ आहारात असणे फायद्याचे असते. 10 / 10पांढरे तीळ कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फॉस्फरसने परिपूर्ण असते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी तीळाचे तेल तसेच आहारात तीळ असणे फायद्याचे ठरते.