1 / 10१. गणपतीला दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणेश स्थापना किंवा गणपतीची पूजा पुर्ण होतच नाही. कदाचित दुर्वांचे अनेक एक से एक औषधी उपयोग असल्यामुळेच बाप्पाला या दुर्वा एवढ्या प्रिय असाव्यात.2 / 10२. दुर्वांचा उपयोग शरीरातील दाह म्हणजेच अंगातील उष्णता कमी करण्यासाठी होतो, हे आपल्याला माहिती आहे. पण या व्यतिरिक्तही इतर अनेक आजारांवर किंवा आरोग्याच्या तक्रारींवर दुर्वा उपयोगी ठरतात. दुर्वांचे उपयोग नेमके कोणते, तेच आता पाहूया.. आयुर्वेदामध्ये दुर्वांचा रस घेण्याचा सल्ला दिला जातो.3 / 10३. दुर्वांमध्ये असणारे 'फ्लॅवोनाईड्स' शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त ठरते. अतिजेवण झाल्यावर अपचनाचा त्रास टाळण्यासाठी दुर्वांचा रस घेण्याचा सल्ला दिला जातो. बद्धकोष्ठतेचा त्रासही दुर्वांमुळे कमी होतो.4 / 10४. युरिन इन्फेक्शन झाल्यास दिवसातून दोन वेळेस दुर्वांचा रस लिंबू पिळून घ्यावा, असे सांगितले जाते.5 / 10५. मासिक पाळीत खूप पोट दुखत असल्यास किंवा ब्लिडिंग खूप जास्त होत असल्यास दुर्वांचा रस घ्यावा.6 / 10६. अंगावरून पांढरे पाणी जाण्याचा त्रास होत असल्यास म्हणजेच महिलांना व्हाईट डिस्जार्च जास्त होत असल्यास दुर्वांचा रस आणि दही एकत्र घेणे फायद्याचे ठरते. 7 / 10७. दुर्वांचा रस घेतल्याने शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. यामुळे मधुमेहींसाठी दुर्वांचा रस अतिशय गुणकारी आहे.8 / 10८. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दुर्वा उपयुक्त ठरतात. दररोज सकाळी दोन टेबलस्पून एवढा जरी दुर्वांचा रस घेतला तरी आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते.9 / 10९. मुळव्याधचा त्रास होत असल्यास दुर्वांचा रस आणि दही घ्यावे.10 / 10१०. पिंपल्स किंवा अंगावर आलेले पुरळ कमी करण्यासाठी दुर्वांचा रस उपयोगी ठरतो.