1 / 9बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढलं की त्याचा संबंध थेट हृदयाशीच असतो. त्यामुळेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढू नये, याची काळजी बहुतांश लोक घेतात. 2 / 9शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू नये म्हणून रोजच्या सवयींमध्ये कोणते बदल करावेत, याची माहिती thehealthsite वर देण्यात आली आहे. त्यानुसार पुढे सांगितलेल्या काही सवयी लावून घेतल्या तर तब्येत ठणठणीत राहण्यास नक्कीच मदत होईल. 3 / 9दिवसाची सुरुवात नेहमी कोमट पाणी आणि त्यात लिंबू पिळून पिण्याने करावी. यामुळे पचनक्रिया उत्तम होण्यास मदत होते.4 / 9नाश्त्यामध्ये नेहमी फायबर भरपूर असणारे पदार्थ घ्यावेत. फळं आणि भाज्या यांचे प्रमाण वाढवावे.5 / 9दररोज ३० मिनिटांसाठी वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग असा व्यायाम करावा.6 / 9ओमेगा ३ फॅटी ॲसिड असणारे पदार्थ आहारात वाढवावेत. यामुळे गूड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास मदत होते.7 / 9कोणत्याही प्रकारचे पॅकफूड, प्रोसेस्ड फूड, जंक फूड खाणे- पिणे टाळावे.8 / 9ग्रीन टीमध्ये भरपूर ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे दिवसातून एकदा किंवा खासकरून सकाळीच एक कप ग्रीन टी घ्यावा. 9 / 9कोणत्याही गोष्टीचा खूप ताण करून घेतल्यानेही कोलेस्ट्रॉल पातळी वाढते. कॉलेस्ट्रॉलसंबंधी सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यांच्या सल्ल्याने औषधी घेणे कधीही अगदी उत्तमच.. पण या काही सवयी स्वत:ला लावून घेतल्या तर नक्कीच त्याचा तब्येतीवर चांगला परिणाम होतो.