1 / 8शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि अंगात ऊर्जा निर्माण होण्यासाठी हिवाळ्यात काही पदार्थ आवर्जून खाल्लेच पाहिजेत. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया.. 2 / 8आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात की हिवाळ्यात बाजरी खायला हवी. बाजरीमधून कॅल्शियम, फायबर भरपूर प्रमाणात मिळते. शिवाय बाजरी उष्ण असल्याने शरीर उबदार ठेवण्यासाठीही उपयोगी पडते. 3 / 8हिवाळ्यात गूळही आवर्जून खा. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडन्ट्स भरपूर प्रमाणात असतात. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गूळ उपयुक्त ठरतो. 4 / 8घरी केलेले साजूक तूपही हिवाळ्यात खायला हवे. शरीराला आवश्यक असणाऱ्या सगळ्याच फॅटी ऍसिडचा उत्तम स्त्रोत म्हणजे साजूक तूप. हिवाळ्याच्या दिवसात हाडांचे दुखणे वाढते. याशिवाय त्वचाही कोरडी पडते. त्यामुळेच या दिवसात तूप आवर्जून खायला हवे. तुपामधून व्हिटॅमिन ए, डी आणि ई चांगल्या प्रमाणात मिळते. 5 / 8प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स, फायबर, व्हिटॅमिन अशा पोषक पदार्थांचा खजिना असणारा सुकामेवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीरातली ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो. थंडीमुळे शरीराला आलेला थकवा दूर करण्यासाठीही सुकामेव्याची मदत होते. 6 / 8मुळा, गाजर, बीट, रताळे, हिरव्या पालेभाज्या यादेखील हिवाळ्यात भरपूर प्रमाणात खायला हव्या. या भाज्यांमधून बीटा कॅरेटीन, फायबर, व्हिटॅमिन सी, लोह, ॲण्टीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात मिळतात. त्याचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचा निरोगी राहण्यासाठी होतो. 7 / 8वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आले घालून खायलाही या दिवसात विसरू नका. यामुळे शरीर उष्ण राहते. शिवाय त्यांच्यामध्ये असणाऱ्या ॲण्टी इन्फ्लेमेटरी, ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टी व्हायरल गुणधर्म हिवाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांपासून संरक्षण करतात. 8 / 8खजुरामध्ये नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते. याशिवाय त्यातून फायबर, लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक खनिजे मिळतात. यामुळे शरीराचे पोषण होते.