1 / 8भारतामध्ये सध्या, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये आढळणारा सर्वात कॉमन असा कर्करोगाचा (7 foods every women should eat to prevent breast cancer) प्रकार आहे. जवळपास प्रत्येक २८ पैकी १ महिलेला याचा (superfoods for breast cancer prevention) धोका संभवतो. नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (NCDIR) नुसार, दरवर्षी या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. 2 / 8आपला रोजचा आहार ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यात (best foods to prevent breast cancer in women) महत्त्वाची भूमिका बजावतो. योग्य पोषण आणि काही खास अन्नपदार्थांचा समावेश आपल्या डेली रुटीनमध्ये केल्यास ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून बचाव होऊ शकतो. ‘गेट फिट विथ लीमा’च्या न्यूट्रीशनिस्ट आणि वेटलॉस स्पेशालिस्ट लीमा महाजन यांनी महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण कमी करण्यासाठी काय खावे, याबद्दल अधिक माहिती त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओमधून दिली आहे. 3 / 8डाळिंबामध्ये एलागिटैनिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणांत असते, जे कर्करोगाच्या पेशींना वाढण्यापासून थांबवतात आणि इस्ट्रोजेनची वाढ कमी करतात. वाढलेले इस्ट्रोजेन हे ब्रेस्ट कॅन्सरचे मुख्य कारण आहे. डाळिंब खाल्ल्याने इस्ट्रोजेनचे प्रमाण संतुलित रहाते. दररोज एक कप ताज्या डाळिंबाचे दाणे नक्की खावेत.4 / 8ब्रोकोली, फ्लॉवर आणि कोबी यांसारख्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये सल्फोराफेन नावाचे खास पोषक तत्व असते. या भाज्यांमधील घटक लिव्हर स्वच्छ करतात आणि शरीरात तयार होत असलेले खराब इस्ट्रोजेन बाहेर टाकतात. जेव्हा लिव्हर व्यवस्थित काम करते, तेव्हा शरीरात गाठी किंवा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही या भाज्या हलक्या उकडवून, वाफेवर शिजवून किंवा सॅलॅडच्या स्वरुपात कच्च्या खाल्ल्यास यांचा फायदा सर्वात जास्त होतो. या भाज्या रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास शरीर स्वच्छ राहते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते.5 / 8आवळा आणि पेरू हे दोन्ही व्हिटॅमिन- 'सी' चे (Vitamin-C) उत्कृष्ट स्रोत आहेत. व्हिटॅमिन- सी हे एक उत्तम अँटी-ऑक्सिडंट आहे, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढते, डीएनएला होणारे नुकसान भरून काढते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. या सर्व गोष्टी कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.6 / 8सोयाबीन आणि डाळी यामध्ये आयसोफ्लेवोन्स नावाचे वनस्पतीजन्य कम्पाउंड असतात. हे कम्पाउंड शरीरात नैसर्गिक इस्ट्रोजेनप्रमाणे हलक्या आणि संतुलित पद्धतीने काम करतात. याचा फायदा असा होतो की, शरीरात अचानक होणारे हार्मोनल बदल नियंत्रित होतात. जेव्हा हार्मोन्स संतुलित राहतात, तेव्हा त्या असामान्य पेशींची वाढ थांबते, ज्या पुढे जाऊन ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे कारण बनू शकतात. रोजच्या आहारात जर टोफू, सोया मिल्क किंवा डाळींचा समावेश केला, तर त्यामुळे शरीराला प्रोटीन आणि ऊर्जा मिळते आणि हार्मोन्सही संतुलित राहतात. यामुळे दीर्घकाळ आरोग्य चांगले राहते आणि कर्करोगासारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.7 / 8अळशीच्या बियांमध्ये लिग्नन्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यांना फायटोइस्ट्रोजेन्स म्हणून ओळखले जाते. हे कम्पाउंड शरीरातील इस्ट्रोजेनचे प्रमाण संतुलित ठेवतात. यामुळे ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशींची वाढ कमी होण्यास मदत होते. अळशीच्या बिया पचनास थोड्या जड असतात, त्यामुळे त्यांना वाटून त्यांची बारीक पूड करुन खाणे उत्तम पर्याय आहे. अळशीच्या बियांची बारीक पूड स्मूदी, दही किंवा सॅलॅडवर भुरभुरवून सहज खाऊ शकता.8 / 8 ऑलिव्ह ऑईलमध्ये पॉलीफेनोल्स असतात, जे शरीरातील सूज कमी करतात, निरोगी पेशींचे रक्षण करतात आणि कँसरच्या गाठींची वाढ मंदावतात. ऑलिव्ह ऑईलचे तेल विशेषतः ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करते. स्वयंपाक करण्यासाठी किंवा सॅलॅडवर घालून खाणे खूप फायदेशीर ठरते.