Join us

कॅन्सरचा धोका कमी करणारे ७ पदार्थ रोजच खा, कॅन्सर सेल्सची वाढही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2025 16:40 IST

1 / 8
कॅन्सर हा आजार हल्ली किती वेगात वाढतो आहे हे आपण बघतोच आहोत. म्हणून त्या आजाराचा धोका जर कमी करायचा असेल तर आपण निरोगी जीवनशैली स्विकारली पाहिजे. त्यातला पहिला आणि मुख्य मुद्दा म्हणजे तुमचा आहार. आपल्या स्वयंपाक घरात असे काही पदार्थ आहेत जे कॅन्सरचा धोका कमी करू शकतात.(7 food items that helps to reduce the risk of cancer)
2 / 8
ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती तज्ज्ञांनी gutstorywithdimple या सोशल मीडिया पेजवर शेअर केली असून त्यातला पहिला पदार्थ आहे हळद. हळदीमध्ये ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टीफंगल, ॲण्टी व्हायरल घटक असतात. (how to reduce the risk of cancer?)
3 / 8
दुसरा पदार्थ आहे अश्वगंधा. स्ट्रेस कमी करण्यासाठी, चांगली झोप येण्यासाठी अश्वगंधा अतिशय उपयुक्त आहे.
4 / 8
कॅन्सर सेल्सची वाढ कमी करणारा आणखी एक पदार्थ म्हणजे आवळा. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायलाही खूप मदत होते.
5 / 8
पोट, आतडे, ब्रेस्ट आणि प्रोस्टेट ग्लँडचा कॅन्सर असणाऱ्यांनी नियमितपणे लसूण खायलाच हवा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
6 / 8
ब्रोकोलीमध्ये सल्फरोफेन हे कम्पाउंड असतं. दररोज ब्रोकोली खाल्ल्याने भरपूर ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात.
7 / 8
पालकामधूनही लोह, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात मिळतात, जेणेकरून आजारांशी लढण्याची ताकद वाढत जाते.
8 / 8
भोपळ्याला आयुर्वेदामध्ये सात्विक अन्न म्हणतात. तो पचायला सोपा असतो. शिवाय तो शरीराला नॅचरली डिटॉक्स करतो. शरीर डिटॉक्स होत गेलं म्हणजेच शरीरातले विषारी घटक शरीराबाहेर पडत गेले तर आपोआपच कॅन्सरचा धोका कमी होतो.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नकर्करोग