1 / 9हृदय रोगाचे प्रमाण सध्या प्रचंड वाढलेले आहे. बदललेली जीवनशैली हे त्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे. त्यामुळेच तर कमी वयातल्या लोकांनाही हल्ली हार्ट ॲटॅक (heart attack) आल्याचे आपण नेहमीच ऐकतो..2 / 9आपल्याला माहितीच आहे की हार्ट ॲटॅक कधीही अचानक येत नाही. मागच्या काही दिवसांपासून आपल्या शरीरात काही बदल होत असतात. ते बदल कधी आपल्याला जाणवतात तर कधी कळतही नाहीत (7 common symptoms of a weak heart). म्हणूनच आपल्याला या काही गोष्टींची माहिती असायलाच हवी.(common symptoms of heart attack)3 / 9टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एक रिसर्च असं सांगतो की हार्ट ॲटॅक येण्याच्या काही दिवस आधी आपल्या शरीरात काही बदल तिव्रतेने दिसायला लागतात. नेहमीचंच साधं दुखणं.. असं म्हणत त्या बदलांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. ते बदल नेमके कोणते ते पाहूया..4 / 9छातीत थोडे अस्वस्थ वाटणे, छातीवर दाब येत आहे, काहीतरी अडकलं आहे, असं वाटणे, सतत जळजळ होणे..5 / 9शरीराचे वरचे भाग म्हणजेच पोट, जबडा, पाठ, मान, हात याठिकाणी काहीतरी जड वाटणे किंवा त्याठिकाणी सतत काहीतरी दुखणे6 / 9अमेरिकन हार्ट असोसिएशन यांच्यामते तुमचा श्वास कमी लांबीचा होणे, झोपल्यावर पुरेसा श्वास न घेता येणे, पायऱ्या चढताना, चालताना खूप दम लागणे हे देखील कमकुमत हृदयाचे एक लक्षण असू शकते.7 / 9काही विशेष किंवा वेगळे काम, दगदग झाली नसली तरी सतत खूप थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे.8 / 9दरदरुन घाम येण्याचे प्रमाण वाढणे. खूप धावपळ झालेली नसली तरी एका जागेवर असूनही खूप घाम येणे.9 / 9नॉशिया येणे, काही खावेसे न वाटणे अशी लक्षणेही काही जणांना हार्ट ॲटॅक येण्यापुर्वी जाणवतात. ही सगळी लक्षणं हार्ट ॲटॅकचीच आहेत, असं मुळीच नाही. पण तरीही असे काही बदल शरीरात होताना दिसले तर त्यांच्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नये, असं तज्ज्ञ सांगतात.