Join us

तिळाचे तेल वापरण्याचे '७' फायदे, आरोग्य राहील चांगले.. तसेच चरबीही होते कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2025 18:53 IST

1 / 10
तिळाच्या तेलामध्ये अनेकविध गुणधर्म असतात. एकच नाही तर त्याचे अनेक फायदे आहेत. अन्नामध्ये या तेलाचा वापर केला जातो. मात्र सगळेच करतात असे नाही. हे तेल फारच पौष्टिक असते.
2 / 10
चमचाभर तिळाचे तेल आठवड्यातून ३ ते ४ वेळा वापरल्याने अनेक कमालीचे फायदे मिळवता येतात. मग ते तुम्ही अन्नात वापरा किंवा लावायला वापरा.
3 / 10
जसे खोबरेल तेल नाभीत टाकल्याचे फायदे असतात तसेच तिळाचे तेल नाभीमध्ये टाकल्याने अनेक फायदे मिळतात. झोपण्यापूर्वी तेलाचा नाभीला मालिश करण्यासाठी वापर करा.
4 / 10
तिळाच्या तेलामुळे झोपेचा त्रास कमी होतो. अनेकांना शांत झोप लागत नाही. मात्र तिळाच्या तेलामुळे छान झोप लागते. मग त्या तेलाने मालीश करा किंवा ते नाभीमध्ये लावा.
5 / 10
केसांच्या आरोग्यासाठी हे तेल फार फायदेशीर असते. जर केस गळत असतील तर तिळाचे तेल वापरा. तसेच केस पातळ होत असतील तर केसांची मजबुतीही या तेलामुळे सुधारते.
6 / 10
दातांसाठी तसेच हिरड्यांसाठी तिळाचे तेल फार गुणकारी असते. हिरड्यांना जर काही कारणांमुळे सुज आली असेल तर सुजही गायब होते.
7 / 10
तिळाचे तेल वजन कमी करण्यासाठी मदत करते. चरबी कमी करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. खाण्यातही वापरा तसेच मसाजही करा.
8 / 10
हृदयाचे विविध आजार होण्यापासून तिळाचे तेल वाचवू शकते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे तेल वापरणे उत्तम ठरते.
9 / 10
तळव्यांचे दुखणे ही एक वाढती समस्या आहे. तळवा दुखायला लागला की काही सुचतच नाही. तिळाच्या तेलाचा वापर करून हे दुखणे थांबवता येते.
10 / 10
हाता-पायांना तसेच बोटांना सारखी सुज येत असेल तर तिळाचे तेल वापरा. या तेलामुळे शरीराला येणारी सुज कमी होते. त्वचाही चांगली होते.
टॅग्स : हेल्थ टिप्सकेसांची काळजीत्वचेची काळजीहोम रेमेडी