1 / 9सुपरमार्केटमध्ये खरेदी करताना आपण अनेकदा चमकदार पॅकेजिंग, आकर्षक ऑफर्स आणि चविष्ट दिसणाऱ्या वस्तूंनी (6 things absolutely never buy from the supermarket) आकर्षित होतो. मात्र, या वस्तूंपैकी अनेक पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.2 / 9 या पदार्थांमध्ये असलेले प्रिझर्व्हेटिव्हज, कृत्रिम रंग, साखर आणि मिठाचे जास्त प्रमाण आपल्या आरोग्यावर दीर्घकाळ नकारात्मक परिणाम करू शकतात. इतकेच नाही तर हे पदार्थ खाल्ल्याने कालांतराने अनेक वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका संभवतो(6 Things Would Never Buy from the supermarket; Know Unhealthy Food Items You Must Delete From Your List).3 / 9यासाठीच, सुपरमार्केटमध्ये खरेदी करताना कोणत्या वस्तूंपासून दूर राहावे याबद्दल न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे यांनी नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत अधिक माहिती दिली आहे. 4 / 9रेडिमेड डेसर्ट मिक्सेस दिसायला आणि चविला आकर्षक वाटले तरी त्यात कृत्रिम चव, रंग, प्रिझर्व्हेटिव्ह आणि भरपूर साखर असते. यामुळे वजन वाढ, ब्लड शुगर लेव्हलमध्ये चढ-उतार आणि पाचन समस्याही निर्माण होऊ शकतात.5 / 9बहुतेक बिस्किट्समध्ये मैदा, ट्रान्स फॅट आणि साखर भरपूर प्रमाणात असते. या गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत. विशेषतः जर आपण दररोज बिस्कीट खात असाल तर हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. 6 / 9या नूडल्समध्ये सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यात पोषणमूल्य जवळपास नसतातच. शिवाय, यामध्ये असलेली आर्टिफिशियल चव आणि वापरलेले तेल पचनासाठी नुकसानकारक ठरतात.7 / 9 सॉफ्ट ड्रिंक्स किंवा पॅकबंद ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात साखर वापरलेली असते, जी इन्सुलिन रेसिस्टन्स, वजन वाढ आणि डायबिटीस सारख्या समस्यांना आमंत्रण देते.8 / 9मार्जरीन हे नैसर्गिक बटरचा पर्याय म्हणून विकले जात असले तरी त्यात ट्रान्स फॅट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.9 / 9फ्रोजन डिनर्स म्हणजेच तयार करून फ्रीझ केलेले जेवण, हे अनेकवेळा प्रिझर्व्हेटिव्हज, सोडियम अशा आर्टिफिशियल घटकांचा वापर करुन तयार केले जाते. यामुळे दीर्घकाळ असे अन्नपदार्थ खाल्ल्यास आरोग्याला धोका पोहोचू शकतो.