Join us

भोपळा-सूर्यफुलाच्या बियांसह ‘या’ ६ बिया वाढवतात फर्टिलिटी-तारुण्य आणि चेहऱ्यावरचं तेज ओसरणारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 17:40 IST

1 / 10
आरोग्याची नियमित काळजी घेण्यासाठी आपण आहारात अनेक बदल करतो. परंतु शरीराला पुरेशा प्रमाणात पोषक तत्व न मिळाल्याने आपले आरोग्य बिघडते.
2 / 10
सध्या केसगळती, केसांची वाढ न होणे, केस रुक्ष होणे, चेहऱ्यावरील डाग, मुरुमे आणि सतत वाढणारा पिंग्मेंटेशनचा त्रासामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्त त्रस्त आहे. (seeds to benefits for health)
3 / 10
आहारात आपण अनेक पालेभाज्या, मांस आणि शरीराला प्रोटीन्स मिळाणाऱ्या पदार्थांचा समावेश करतो. परंतु, सुपर सीड्स ही नियमितपणे खायला हवे. (seeds to boost fertility)
4 / 10
सुपर सीड्स आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहेत. यामध्ये भोपळ्याच्या बिया, चिया बिया, फ्लेक्स बिया, मगज बिया आणि सूर्यफुलाच्या बिया आहेत. नियमितपणे खाल्ल्याने आरोग्याला कसा फायदा होतो जाणून घेऊया.
5 / 10
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हॅटिमन इ आणि प्रोटीन असते ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. तसेच केसगळती देखील थांबते.
6 / 10
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे महिला आणि पुरुष दोघांच्याही प्रजननक्षमतेसाठी महत्त्वाचे आहे. यामध्ये ओमेगा - ३ फॅटी अॅसिड देखील असते. जे बाळाच्या मेंदू आणि डोळ्यांच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.
7 / 10
अळशीच्या बियांमध्ये लिग्रान्स भरपूर प्रमाणात आढळते. यामुळे हार्मोन्स संतुलित करण्यास आणि प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते. ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबर यामध्ये आहे.
8 / 10
चिया सीड्समध्ये फायबरचे स्त्रोत आहे. जे बद्धकोष्ठता रोखण्यास मदत करते. यात असणारे ओमेगा-३ फॅटी अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स प्रथिने समृद्ध करतात.
9 / 10
भांगाच्या बियामध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिडचे चांगले संतुलन आहे. जे बाळाच्या मेंदू आणि डोळ्यांच्या विकासासाठी बहुगुणी आहे.
10 / 10
काळ्या तिळात अनेक पोषक घटक आढळतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम, जस्त, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6, फॉस्फरस, फायबर आहे. ज्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. तसेच हाडे मजबूत होऊन रक्तदाब नियंत्रणात राहातो.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स