Join us

'या' कारणांमुळे वाढतो अचानक हार्ट फेल्युअरचा धोका! ९० टक्के लोक यातली १ तरी चूक रोज करतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 20:30 IST

1 / 8
सध्या कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. तरुण लोकांनाही हार्ट ॲटॅक आल्याचे आपण नेहमीच ऐकतो.
2 / 8
आता आपण अशी काही कारणं पाहूया जी हार्ट फेल्युअरसाठी कारणीभूत ठरतात. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संजीवकुमार गुप्ता यांनी याविषयी सांगितलेली माहिती इंडियन एक्सप्रेस ग्रुपने प्रकाशित केली आहे. त्यानुसार काही गोष्टी जर आपण वारंवार करत गेलो तर हार्ट फेल होण्याचा धोका वाढत जातो. त्या चुका नेमक्या कोणत्या ते पाहा..
3 / 8
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अपुरी झोप. हल्ली रात्री उशिरापर्यंत स्क्रिन पाहात बसण्याचे प्रमाण तरुणांमध्ये प्रचंड वाढले आहे. नेहमीच असं करत असाल तर त्याचा तुमच्या हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
4 / 8
तुम्हाला रोजच खूप प्रदुषणाचा सामना करावा लागत असेल तर ते ही तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाही असं डॉक्टर सांगतात.
5 / 8
सतत खूप तणावात राहात असाल तर शरीरातल्या कॉर्टीसॉल हार्मोनचे प्रमाण वाढत जाते. यामुळे रक्तदाबासारखा त्रास होऊन हृदयरोगाचाही धोका वाढतो. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करा. मन शांत ठेवण्याचे वेगवेगळे पर्याय शोधून काढा.
6 / 8
डॉ. गुप्ता सांगतात की वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुमचे दात आणि हिरड्या यांची स्वच्छता ठेवून त्यांचे आरोग्य जपणेही खूप गरजेचे आहे. कारण Healthy gums = Healthy heart हे समीकरण आहे.
7 / 8
काही जणांना वेळेमुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांच्या खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष देता येत नाही, तर काही जणांना घरचं तेच ते अन्न सतत खाण्याचा कंटाळा येतो. या दोन्ही प्रकारचे लोक सतत बाहेरचं खातात. चुकीचा आहार घेतात, त्यामुळे त्यांचा हृदयविकाराचा धोका वाढतो.
8 / 8
हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पोटाचीही व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. जर तुम्हाला वारंवार अपचनाचा त्रास होत असेल तर त्यामुळे कोलेस्टेरॉल, रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात फायबर, आंबवलेले पदार्थ जास्त प्रमाणात घ्या आणि पचनक्रियेकडेही लक्ष द्या, असं डॉक्टर सांगतात.
टॅग्स : आरोग्यहृदयविकाराचा झटकाहृदयरोगअन्नहेल्थ टिप्स