Join us

हृदयासाठी ६ पदार्थ अत्यंत धोकादायक! तुम्ही रोज खात असाल तर वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2025 18:35 IST

1 / 8
हल्ली हृदयविकाराचा झटका येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला आरोग्याची नीट काळजी घेता येत नाही. सततचे जंकफूड, अपुरी झोप, तेलाचे-साखरेचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होतो. (Dangerous foods for heart patients)
2 / 8
डॉक्टर सांगतात चुकीचा आहार, साखर, मीठ, मांस आणि साखरेचे पेय यांसारखे पदार्थ हृदयरोगाचा धोका दुप्पटपटीने वाढवतात. आपण जर आहारात रोज खाल्ले तर हार्ट ॲटॅक येण्याची शक्यता अधिक असते. हृदयासाठी कोणते ६ पदार्थ अंत्यत धोकादायक आहेत पाहूया. (Heart attack risk foods)
3 / 8
तळलेले किंवा फ्रेंच फ्राईज खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो. यात असणारे ट्रान्स फॅट हे रक्तातील कोलेस्टेरॉल वाढते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
4 / 8
रेड मीट, स्टेक, मिन्समीट आणि बेकन सारख्या गोष्टी हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. त्यामध्ये असलेले अमीनो आम्ल आतड्यांतील बॅक्टेरियांवर परिणाम करतात.
5 / 8
पांढऱ्या ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. जे खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो. यात असणारे साखरेचे आणि मीठाचे प्रमाण वेगाने वाढते. जे रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचवते.
6 / 8
पिझ्झा आणि कॉर्नफ्लेक्स हे हृदयासाठी चांगले नाही. यात कार्बोहायड्रेट्स आणि साखर असते. ज्यामुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढते आणि रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम होतो.
7 / 8
इन्स्टंट सूपमध्येही भरपूर मीठ असते. ज्यामुळे हृदयरोग आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.इन्स्टंट सूपमुळे कार्डिओमेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका जवळजवळ दुप्पट असतो.
8 / 8
एनर्जी ड्रिंक्समध्ये गोडाचे आणि कॅफिनचे प्रमाण जास्त असते. हे पेय प्यायल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटका