सकाळी पाेट साफ व्हायला खूप त्रास होतो? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय- गॅसेस, ॲसिडीटीही कमी होईल
Updated:December 15, 2025 16:44 IST2025-12-15T16:37:33+5:302025-12-15T16:44:09+5:30

काही जणांना कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास होतो. त्यामुळे मग सकाळी पोट साफ व्हायला बराच वेळ लागतो. किंवा कधी कधी तर पोट साफ होतच नाही.(5 yoga poses to get rid of indigestion, bloating and gases)
हिवाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होत असल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास तर जास्तच वाढतो. अशावेळी योगगुरु रामदेव बाबांनी सांगितलेले काही व्यायाम करून पाहा. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅसेस असे पचनाशी संबंधित सगळेच त्रास कमी होतील.(how to get relief from constipation, bloating and gases?)
पहिलं आसन म्हणजे पवनमुक्तासन. यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होते आणि पोटातले गॅसेस कमी होऊन पोट कमी होण्यासही मदत होते. हे आसन दररोज २ ते ३ मिनिटं करावं. पण सुरुवातीला कमी वेळ करत हळूहळू वेळ वाढवत न्यावा.
उत्तानपादासन केल्यामुळेही आतड्यांचा व्यायाम होतो. त्यांच्यावर योग्य तो दाब पडतो आणि त्यामुळे अन्नपचन चांगलं होऊन पचनाशी संबंधित कित्येक त्रास कमी होतात.
नौकासन केल्यामुळेही पोटाच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो. या आसनामुळे पचनाच्या तक्रारी तर दूर होतातच. पण पोटावरची चरबी कमी होण्यासही मदत होते.
अपचनाचा त्रास कमी करणारे आणखी एक आसन म्हणजे मलासन. मलासनात बसून गरम पाणी प्यायल्याने या आसनाचा अधिक फायदा होतो असं म्हणतात.
पोटाच्या तक्रारी कमी होण्यासाठी सेतूबंधासनही नियमितपणे करायला हवे. ही सगळी आसने सकाळी उपाशीपोटी केल्यास अधिक चांगले. पण त्यावेळी करणं शक्य होत नसेल तर जेवण झाल्यानंतर ४ ते ५ तासांनी करावे.